Aditya Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Aditya Thackeray : युवराजांची फुलराणीतून सवारी! आदित्य ठाकरे पोहोचले माथेरानला | Video

सकाळ डिजिटल टीम

माथेरान - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माथेरानचा दौरा केला आहे. यावेळी त्यांनी अमन लॉज ते माथेरान असा फुलराणीतून प्रवास केला आहे. त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. त्याचबरोबर अनेक पर्यटकांनीही त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली.

"माथेरान हिल स्पोर्ट्स क्लब आज लॉन्च करत आहोत. मुंबई फुटबॉल असोसिएशनच्या 24 टीम येथे येऊन खेळून गेल्या त्या सगळ्यांना भेटण्यासाठी, बक्षीस समारंभासाठी आणि खेळासाठी इथे आलो." असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

या क्लबमध्ये क्रिकेट, फुटबॉल सारखे खेळ सुरू करू. मुलांना खेळण्याची संधी देणं खूप महत्त्वाचं आहे. 2017-18 च्या वेळी इथे आलो तेव्हा देखील इथल्या मुलांना खूप मजा आली होती. मुळात मैदानी खेळ सतत खेळले गेले पाहिजेत त्यासाठी प्रोत्साहन द्यायला इथे आलो आहे असं ते म्हणाले.

माथेरान विकासाबद्दल काय म्हणाले आदित्य ठाकरे?

उद्धव साहेबांनी इथे पहिला निधी दिला होता 42 कोटींचा. त्यातून अनेक रस्ते अनेक पॉईंट्स, टाऊन हॉल, लायब्ररी यांचं नूतनीकरण झालं. माथेरान किंवा महाबळेश्वर या दोन्ही ठिकाणी डागडूजीची गरज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र करायचं आहे. अनेक चांगल्या गोष्टी झाल्या आहेत. पुढे जात असताना अशा काही चांगल्या गोष्टी पर्यटकांसाठी होणं गरजेचं आहे. एमटीडीसी हॉटेल सोबत जॉईंट वेंचर करायचं होतं, ते अडकलं आहे.

हे सरकार आल्यानंतर काही गोष्टींना स्थगिती दिली आहे. मात्र पुन्हा एकदा आमचं सरकार आल्यानंतर चांगल्या गोष्टींना आम्ही प्रगतीपथावर आणणार आहोत, आमचं सरकार पडायच्या काही महिने आधी इथे आलो होतो. त्यावेळी ज्या कामांना सुरुवात केली होती तीही लवकरच पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT