political esakal
महाराष्ट्र बातम्या

हनुमान चालिसा प्रकरण तापलं; शिवसैनिकांचा रवी राणांच्या दारात ठिय्या

मातोश्रीवर जाण्याअगोदर आमच्यासमोर हनुमान चालीसा म्हणून दाखवा, शिवसेनचं आव्हान

सकाळ डिजिटल टीम

मातोश्रीवर जाण्याअगोदर आमच्यासमोर हनुमान चालीसा म्हणून दाखवा, शिवसेनचं आव्हान

मागील काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील भोंगे काढण्यावरून आणि हनुमान चालीसा पठणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, आता अमरावतीत राणा दाम्पत्या विरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे. आज शिवसेनेनं राणा यांच्या घरावर धडक मोर्चा काढला. यावेळी शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी झाली. राणा यांच्या घराकडे जाणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी रोखलं आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी ठिय्या मांडंत आंदोलन सुरु केलं. मातोश्रीवर जाण्याअगोदर आमच्यासमोर हनुमान चालीसा म्हणून दाखवा असं आव्हानही शिवसैनिकांनी दिलं आहे. यावेळी आंदोलकांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान दिले होते. या आव्हानावरून आता अमरावतीमधील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांना आमदार राणा यांनी दिलेल्या आव्हानावर या शिवसैनिकांनी प्रतिआव्हान दिले होते की, आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण केले नाही तर हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी राणा यांच्या घराबाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करणार. त्यानुसार प्रतिउत्तर देण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक आज राणा यांच्या घराबाहेर दाखल झाले आहे. यावेळी शिवसैनिकांनी राणा यांच्या घरासमोर ठिय्या मांडला. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शिवसैनिकांना रोखण्यासाठी राणा यांच्या घराबाहेर पोलिसांनी मोठे बॅरिगेटिंग लावले आहेत. दरम्यान खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, मी मुंबईची मुलगी विदर्भाची सुन आहे. मी मुंबईत जाऊन मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करणार म्हणजे करणार त्यांच्यामध्ये काहीही दुमत नाही. हिंमत असेल तर अडवून दाखवा, असा इशारा नवनीत राणां यांनी शिवसेनेला इशारा दिला होता. यावरून अमरावतीत शिवसैनिक आक्रमक झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Supreme Court Hearing: ठाकरे गटाची याचिका, निवडणूक आयोगावर सवाल अन् धनुष्यबाणाचा पेच; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या

RTI Penalty Vasai-Virar: वसई-विरार महापालिकेला ५० हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश; RTI अर्जदाराला मानसिक-आर्थिक त्रास

Marathi poetry translation in Mexico: मराठी काव्यानुवादाचा मेक्सिकोत डंका; डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या अनुवादित कविता ‘अल्किमिया देव रेलाम्पागो’मधून प्रकाशित

Marathi News Live Updates : माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, संसदीय समितीचा अहवाल समोर..

Viral Video : आजीचं स्वप्न नातीने केलं पूर्ण; पहिल्यांदाच विमानात बसवून नेलं गोव्याला, हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT