kirit somaiya attack 
महाराष्ट्र बातम्या

'हा तर जिवे मारण्याचा कट', सोमय्यांकडून नवा व्हिडिओ व्हायरल

ओमकार वाबळे

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत हल्ला झाला. शिवसैनिक आक्रमक झाल्याने त्यांना माघारी परतावं लागलं. यावेळी झटापट झाल्याने सोमय्यांचा तोल गेला आणि पायऱ्यांवर पडल्याने त्यांना दुखापत झाली. या गडबडीनंतर किरीट सोमय्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशाने झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला. आता त्यांनी नवा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामधून काही नवे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. (Shivsena attacked kirit somaiya in PMC)

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत हल्ला झाला. शिवसैनिक आक्रमक झाल्याने त्यांना माघारी परतावं लागलं. यावेळी झटापट झाल्याने सोमय्यांचा तोल गेला आणि पायऱ्यांवर पडल्याने त्यांना दुखापत झाली. या गडबडीनंतर सोमय्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशाने झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला. आता त्यांनी नवा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामधून काही नवे प्रश्न उपस्थित होऊ शकतात.

सोमय्यांवर हल्ला झाल्यानंतर त्याची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणाला अटक करण्यात आलेलं नाही. पण, पुढील कारवाईसाठी पथके रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रशांत लाडे (वय ३०) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, भादवी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४ तसेच मु.पो.अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ नुसार शहरअध्यक्ष संजय मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सुरज लोखंडे, आकाश शिंदे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनि गवते यांच्यासह ६० ते ७० महिला व पुरूष कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमय्यांवर हल्ला झाल्यानंतर त्यांना शिवसेना जिवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. खुद्द सोमय्यांनी याला पुष्टी देत नव्याने व्हिडीओ जारी केला आहे. या घटनेनंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुंपली असून आरोपप्रत्यारोप सुरू झाले. भाजपाचे किरीट सोमय्या यांना रुग्णालयातून सुखरुप घरी आणण्यात आलं आहे. यानंतरही ठाकरे सरकराचे भ्रष्टाचाराचे कारनामे बाहेर काढणार असल्याच्या दाव्यावर सोमय्या ठाम आहेत, असं भाजप नेते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra GAIL Project: आता वाऱ्यापासून वीज तयार होणार! गेल महाराष्ट्रात मेगा प्रकल्प उभारणार; पवनऊर्जा विस्ताराला बूस्ट मिळणार

Ajit Pawar, DGCA Report आला समोर, आदिती तटकरे थेट बोलल्या...

T20 WC: फखरची साथ अन् फरहानने मोडला विराटचा १२ वर्षे जूना विश्वविक्रम! पाकिस्तानच्या सलामीवीरांनी श्रीलंकेला घरच्या मैदानातच रडवलं

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : बर्ड फ्लूच्या खबरदारीमुळे संजय गांधी बायोलॉजिकल पार्क तात्पुरते बंद करण्यात आले

SCROLL FOR NEXT