संजय राऊत  File photo
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना भवन तोडू, हे बोलणे रोगट लक्षण!

सकाळ वृत्तसेवा

प्रसाद लाड यांनी माहिम येथील सभेत वेळ पडल्यास शिवसेना भवन तोडू, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय वादंग सुरु झालं आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यातच आता शिवेसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना भवन तोडू हे बोलणे रोगट लक्षण आहे, अशी तिकट प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेना भवन तोडू हे बोलणे रोगट लक्षण आहे. ज्यांना मराठी अस्मितेची जाणीव आहे, ते असे बोलणार नाहीत. मूळ भाजपचे कार्यकर्ते आणि नेते असे म्हणार नाहीत. बाहेरून आलेले बाटगे असे बोलतात, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

शिवसेना भवनावर हल्ला करणाऱ्यांची भाषा करणाऱ्याचे राजकारण शिल्लक राहिले नाही, अशी भाषा करणाऱ्या बाहेरच्या लोकांमुळे भाजप डुबेल. त्याची माफी मान्य नाही, असेही राऊत म्हणाले.

लाड यांचं स्पष्टीकरण?

प्रसारमाध्यांतून माझ्या भाषणाचा विपर्यास केला आहे. मी शिवसेना भवन फोडणार, अशा बातम्या दिसत आहे. पण यावर स्पष्टीकरण देऊ इच्छितो. असं मी काही करणार नाही. पण, जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेनेचं उत्तर दिलं जाईल. ज्या शिवसेना प्रमुखांवर आम्ही प्रेम करतो, आदर ठेवतो. त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाबद्दल माझ्याकडून तरी असं कोणतंही वक्तव्य केलं नाही. मला असं म्हणायचं होतं की, आम्ही माहीममध्ये जेव्हा येतो, तेव्हा एवढा बंदोबस्त ठेवला जातो, की जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत. या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांत या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय. त्यावर माझं स्पष्टीकरण. मला कोणत्याही प्रकारे शिवसेना प्रमुख आणि शिवसेना भवनाबद्दल अनादर करायचा नव्हता.

काय म्हणाले होते लाड?

भाजपच्या माहिम कार्यालयाबाहेर पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम गेल्या आठवड्यात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या कार्यक्रमाला नितेश राणेही उपस्थित होते. यावेळी लाड म्हणाले की, नितेशजी, पुढील कार्यक्रमला कायकर्ते थोडे कमीच आणू. कारण आपण आलो की पोलिस जास्त येतात. फक्त पोलिसांना गणवेश घालून पाठवू नका, असे सांगायला पाहिजेच. कारण त्यांना तुमची आमची इतकी भीती आहे की आण माहीमध्ये जरी आलो तरी त्यांना वाटतं की हे शिवसेना भवन फोडणारच... काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू. या वक्तव्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

SCROLL FOR NEXT