Maha Vikas Aghadi Sakal
महाराष्ट्र बातम्या

विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना देणार उमेदवार?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - अनेक धक्कादायक घडामोडींनंतर अखेर भाजप आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाने राज्यात सत्तास्थापन केली. आता एकनाथ शिंदे आणि भाजपने पुढील कामकाज सुरू केले असून आता नव्या सरकारने महत्त्वपूर्ण अशा विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर केला आहे. तर महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेना उमेदवार देणार असल्याची चर्चा असल्याचं समोर आलं आहे. (ShivSena candidate for Assembly Speaker)

भाजपने विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. शुक्रवारी नार्वेकरांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. तर दुसरीकडे शिवसेना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार असल्याचं काही माध्यमांमधून समोर येत आहे . त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेना उमेदवार देणार असल्याची माहिती माजी विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटल्याचे माध्यमांमधून समोर आले मागील अनेक दिवसांपासून विधानसभा अध्यक्षांच पद रिक्त असून उपध्यक्ष नरहरी झिरवळ हेच महाविकास आघाडीच्या काळात कामकाज पाहात होते. आगामी काळात विधानसभा अध्यक्षपद अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून भाजपने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शिवसेना कोणाला उमेदवारी देणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : सर्फराज कभी धोका नही देता! भारताला हरवल्यानंतर पाकड्यांचे मानसिक संतुलन ढासळले, पाकिस्तानी मेंटॉरची मान पकडली अन्...

Lionel Messi India Tour : 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी लिओनेल मेस्सीला किती कोटी रुपये मिळाले? पोलिस तपासात आयोजकाचा खुलासा

सुरज चव्हाणने दिलेला शब्द मोडला; नव्या घराला नाही दिलं 'बिग बॉस'चं नाव; नव्या नेमप्लेटवर कुणाचं नाव?

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील शासकीय निवासस्थानी विजयी उमेदवारांचा सत्कार

शाहूपुरीची पंचवीस वर्षांची पाटीलकी संपुष्‍टात! नवख्‍या अक्षय जाधव यांना मतदारांची पसंती, राजकीय चक्रव्यूह भेदले..

SCROLL FOR NEXT