Shivsena Attack on eknath shinde after lpg rate hike 
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रावर आता पैशांचा पाऊस पडेल; शिंदेंच्या दिल्लीवारीवर सेनेचा टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिवसेनेकडून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर हल्लाबोल करण्यात येत आहे. शिवसेनेकडून खासदार संजय राऊत, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दररोज हल्लाबोल करत आहेत. आज पुन्हा एकदा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ''सामना''च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिवेसनेने टीका केली आहे. (Shivsena criticise to CM Eknath Shinde's Delhi Tour)

मुंबईचे महत्त्व कमी कऱण्याची एकही संधी दिल्लीकरांकडून सोडली जात नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला निघाले आहेत.त्यांनी महाराष्ट्राची भूमिका भक्कमपणे मांडावी अशी आशा शिवसेनेने (Shivsena) व्यक्त केली आहे. आपल्या गटासाठी मंत्रीपदी अधिक मिळविण्यासाठी हा दौरा असेल तर काही बोलायला नको. मात्र इतर बाबतीत भाजपच्या 'हो'ला 'हो' केलंत तर मुंबई हातची जाईल, तसेच महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे भाजपचे मनसुबे तडीस जातील. तेव्हा शिंदे गट काय करणार असा सवालही 'सामना'तून उपस्थित कऱण्यात आला.

'शिवसेनेत फूट पाडून व मराठी माणसांची ऐक्याची वज्रमूठ फोडून शिंदे हे दिल्लीस जात आहेत. शिंदे व त्यांच्या लोकांनी जे केले, त्यामुळे मुंबईवरील मराठी माणसांचा पगडा कमी होईल व दिल्लीला नेमके तेच हवे आहे. मात्र जाताना त्यांनी महाराष्ट्रहिताचा कोणता कार्यक्रम पंतप्रधानांच्या समोर ठेवण्यासाठी नेला ते स्पष्ट केले पाहिजे', अशी मागणी सामनातून करण्यात आली. इकडे महाराष्ट्रात शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे समजताच तिकडे बेळगावसह संपूर्ण सीमा भागात मराठी जनांत आक्रोश सुरू झाल्याचंही म्हटलं आहे.

"महाराष्ट्राचे तीन तुकडे करून तीन वेगळी राज्ये निर्माण करण्याचा विचार दिल्लीच्या मनात आहे व त्याची लवकरच अंमलबजावणी होईल, असे कर्नाटकातील भाजपचे मंत्री जाहीरपणे बोलतात. त्यावर ना मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ना नागपूरकर उपमुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका! महाराष्ट्र तोडण्याच्या केंद्रीय योजनेस या दोघांचा छुपा पाठिंबा तर नाही ना? अशी शंकाही सामनातून व्यक्त कऱण्यात आली आहे.

"एकनाथ शिंदे यांनी वेगळा मार्ग त्यांच्या मर्जीने स्वीकारला असला तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कोणी कौतुक करीत असेल तर ते स्वीकारणारे ‘मन’ आमचे आहे. महाराष्ट्रावर आता पैशांचा पाऊस पडेल, हात पुढे केला की हवे ते मिळेल. कारण महाराष्ट्रात दिल्लीच्या मनाप्रमाणे घडले आहे. शिंदे व त्यांच्या लोकांनी दिल्लीस हवे तसे करून दिले आहे, अशी खोचक टीकाही करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT