Uddhav Thackeray Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

"शिवजयंतीस आम्ही दुश्मनांना..."; शिवसेनेचा दिल्लीश्वरांवर वार

तिथीनुसार साजरी केल्या जाणाऱ्या शिवजयंतीच्या दिवशी शिवसेनेकडून भाजपला इशारा.

सुधीर काकडे

छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार जयंती आहे. शिवसेना, मनसेसह इतर अनेक संघटना आणि शिवप्रेमींकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जातेय. तर दुसरीकडे राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांचा खेळ देखील सुरुच आहे. आज शिवजयंचीचं औचित्य साधून शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये शिवाजी महाराजांवर अग्रेलेख लिहिला गेला आहे. महाराष्ट्राच्या दुश्मनांसाठी शिवचरित्र हा एक धडा आहे असं या अग्रलेखातून म्हटलं आहे. यावेळी शिवसेनेनं अप्रत्यक्षपणे विरोधकांना इशारा दिला आहे.

राज्यात मागच्या काही दिवसांपासून, सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात राजकीय चिखलफेक सुरु आहे. शिवसेनेनं आज सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राला झुकवणं दिल्लीश्वरांना कधी जमणार नाही, असं म्हणत सामनातून नाव न घेता भाजपवर टीका करण्यात आली आहे.

सामनामध्ये काय म्हटलंय?

"महाराष्ट्राला वाकवणे व झुकवणे दिल्लीश्वर व त्यांच्या चमच्यांना कधीच जमले नाही. शिवरायांचे राज्य श्रमिकांचे होते. त्याच श्रमिकांनी लढून मुंबईसह महाराष्ट्र मिळवला. तोच श्रमिक बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट पाठीराखा बनला. महाराष्ट्र कधीच रडत बसला नाही. हीच शिवरायांची प्रेरणा. मुजरे आणि हुजरे करणाऱयांत महाराष्ट्राची गणना झाली नाही, हेच खरे शिवचरित्र. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्य दिले, ते शौर्य आजही भवानी तलवारीसारखे धारदार व खणखणीत आहे. आजच्या शिवजयंतीस आम्ही महाराष्ट्राच्या दुश्मनांना त्याची जाणीव करून देत आहोत. महाराष्ट्राच्या दुश्मनांसाठी शिवचरित्र हा एक धडा आहे!" असं म्हणत सामानतून अप्रत्यक्षपणे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

तेजश्री प्रधानला रिप्लेस करणारी अभिनेत्री होणार आई; समुद्रकिनारी फोटोशूट करत दाखवला बेबी बंप, तुम्ही ओळखलंत का?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

SCROLL FOR NEXT