Nitesh Rane esakal
महाराष्ट्र बातम्या

तुम्ही चिरकत रहा..; उद्धवजींमध्ये राहुलजी आम्हाला स्पष्टपणे दिसू लागलेत

सकाळ डिजिटल टीम

आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. आमचा आवाज दाबवणारा कधीच जन्माला येऊ शकत नाही

आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. आमचा आवाज दाबवणारा कधीच जन्माला येऊ शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) दसरा मेळाव्यातून (Shivsena Dasara Melava 2021) विरोधकांवर हल्लाबोल केला. 'काही जण केवळ माझं भाषण संपण्याची वाट पाहताहेत. भाषण कधी थांबतंय आणि कधी एकदा चिरकतोय, अशी काहींची अवस्था झालीय, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणाला प्रत्युत्तर देताना नितेश राणेंनी (Nitesh Rane) उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय.

दसरा मेळाव्यानंतर आता पूर्ण आत्मविश्वासानं सांगू शकतो, आम्हाला उद्धवजींमध्ये राहुलजी एकदम स्पष्टपणे दिसतात. यात कोणतीही शंका नाही, असं म्हणत नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना टोला हाणला. तुम्ही चिरकत रहा, पण माझा वाडा चिरेबंद आहे. माझा वाडा चिरेबंद आहे.. टकरा मारा.. मुसंड्या मारा, डोकी फुटतील, पण तडा नाही जाणार, अजिबात जाणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात विरोधकांवर निशाणा साधला होता. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. त्यावर नितेश राणेंनी प्रत्युत्तर देताना ठाकरेंवर जोरदार प्रहार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

BRICS Declaration: ‘ब्रिक्स’ची एकजुटीची हाक; युद्धखोरांना आरसा, नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर

SCROLL FOR NEXT