Dasara Melava esakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा होतो, तो म्हणजे शिवाजी पार्कवर- उद्धव ठाकरे

शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थोपटले दंड

सकाळ डिजिटल टीम

Dasara Melava: दसरा मेळाव्याच्या वादात हायकोर्टाने शिवाजी पार्क ठाकरेंच्या शिवसेनेच्या पारड्यात टाकलं आहे. दरम्यान शिंदे गटाकडेही आता बीकेसीतल्या मैदानाचा पर्याय आहे. त्यामुळे आता इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. यासाठी आता शिंदे गट जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहे.

तर शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आता दंड थोपटले असून बंजारा समाजातील मते आपल्याकडे वळवण्यासाठी बंजारा समाजाचे आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शुक्रवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांना चांगलाच धक्का बसला आहे.

दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य केले ते म्हणाले "शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा होतो, तो म्हणजे शिवाजी पार्कवर, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी लाखो शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे.

राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी त्या-त्या जिल्ह्यातील प्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुमचे आई-वडील कोण हे आम्हीच ठरवायचं का? SIR प्रकरणी याचिकेवर CJI सूर्यकांत यांची नाराजी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

अपूर्वा नेमळेकरने स्वत:च्या लग्नात शरारत गाण्यावर केला धमाकेदार डान्स, VIRAL VIDEO

"माझा पार्टनर फक्त.." धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणालचा खुलासा; म्हणाली..

Karad Crime: शाळकरी विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग; व्हॅलेंटाइन डेदिवशी धक्कादायक घटना उघडकीस, कऱ्हाडमध्ये उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT