maharshtra politics Uddhav Thackeray  Uddhav Thackerays Latest News
महाराष्ट्र बातम्या

"दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार अन् तेही शिवसेनेचाच"

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या उद्धव कदम यांनी ठाकरेंची भेट घेतली. यावेळी 'दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार आणि तेही शिवतीर्थावरच होणार' असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे.

(Shivsena Dasra Melava Updates)

शिवतीर्थावर दरवर्षी होत असलेला दसरा मेळावा यावर्षी कुणाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना शिंदे गट आणि शिवसेनेनेही मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती पण अद्याप पोलिसांकडून कुणालाच परवानगी देण्यात आली नाही. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असल्याचं आज पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

"मातोश्री हे हिंदुत्वाच्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मंदिराचा गाभारा आहे. त्याचं महत्व आणि महात्म्य टिकून राहिलं पाहिजे. कारण मुंबई टिकली तर महाराष्ट्र टिकेल आणि महाराष्ट्र टिकला तर महाराष्ट्राची अस्मिता टिकेल, पण आता आम्ही शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या शिवबंधनामध्ये काम करण्यासाठी आलेलो आहोत." असं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी उद्धव कदम यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

Mumbai: १० वर्षीय मुलीनं १८ महिन्यांच्या बाळाला इमारतीवरून खाली फेकलं, गोरेगावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Update : मसाल्यांमध्ये रंगांचा वापर चालणार नाही- तुकाराम मुंढे

SCROLL FOR NEXT