Bharat Gogawale Sakal
महाराष्ट्र बातम्या

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंच्या मुलाला मारण्याची धमकी

सकाळ डिजिटल टीम

रायगड : शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या मुलाला धमकी देण्यात आली आहे. अनोळखी व्यक्तीच्या फोनवरून फोन आला आणि मारण्याची धमकी आली असल्याचं भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी सांगितलं. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, "मागच्या काही दिवसांपासून आम्हाला या नंबरवरून फोन येत आहे. याअगोदर माझ्या वडिलांच्या नंबरवर सुद्धा फोन करत या अनोळखी व्यक्तीने मारण्याची धमकी दिली होती. तुम्ही शिंदे गटात कसे काय सामील झाला असं विचारत आम्हाला धमक्या देण्यात आल्या आहेत पण आम्ही या धमक्यांना घाबरत नसून शिंदे गटाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. आमच्यासोबत संपूर्ण रायगड जिल्ह्याचा शिंदे गटाला पाठिंबा आहे. यासंदर्भात मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे." असं भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेनेला बंड करून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत सेनेचे काही आमदार गुवाहटीला गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे विधिमंडळाचे प्रतोद सुनील प्रभू यांना काढून टाकत त्यांच्या जागी भरत गोगावले यांची निवड केली होती. त्यामुळे गोगावले यांचे शिंदे गटातले स्थान वाढले आहे. त्याचबरोबर शिंदे गटाने जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये भरत गोगावले यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांच्या मुलाला मिळालेल्या धमकी मुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT