Shivsena Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: कोंडीत पकडण्याचा प्रयत्न? ठाकरे गटाच्या ४ खासदारांना शिंदे गट पाठवणार नोटीस; काय आहे प्रकरण?

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्याप यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली नाही

अंकिता खाणे (Ankita Khane)

व्हीप नाकारल्याने शिवसेनेकडून(शिंदे गट) ठाकरे गटाच्या ४ खासदारांना नोटीस पाठवण्यात /येणार आहे. शिंदे गटाच्या प्रतोद भावना गवळी यांच्याकडून ठाकरे गटाला नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर या खासदारांना भावना गवळी यांच्याकडून नोटीस पाठवण्यात येणार आहे.

विशेष आधिवेशन काळात ठाकरे गटाच्या खासदारांनी व्हीप नाकारल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. महिला आरक्षण विधेयकावेळी ठाकरे गटाच्या ४ खासदारांचा गैरहजेरी होती. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देण्याच्या कृतीवर ठाकरे गटाच्या खासदार विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे आणि संजय जाधव यांना नोटीस पाठवून कारवाई केली जाईल, असं शिंदे गटाने पत्रद्वारे सूचित केले आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या लोकसभेच्या प्रतोद भावना गवळी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी १४ सप्टेंबर रोजी व्हीप काढला होता. महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने शिवसेना खासदारांनी मतदान करावं, असं भावना गवळी यांनी व्हीपद्वारे म्हटलं होतं. परंतू ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, राजन विचारे, ओमप्रकाश निंबाळकर, संजय जाधव हे हजर राहिले नसल्यामुळे त्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेले नाही. त्यामुळे शिंदे गटाने यासंदर्भात कायदेशीर बाजू तपासण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान या चारही खासदारांना एक नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाने एका पत्रकाद्वारे दिली आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्याप यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT