Eknath Shinde and Uddhav Thackeray  Esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde: कोरोना काळात ठाकरे सरकारनं मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्लं; एकनाथ शिंदेंचा पलटवार

Eknath Shinde's counterattack...

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली-

नक्षलवाद्यांच्या संदर्भात करायवयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बैठक बोलवली होती. यावेळी ७ ते ८ राज्याचे मुख्यमंत्री आले होते, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांवर प्रत्युतर दिलं आहे.

कोरोना काळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार त्यांच्या सरकारमध्ये झालाय. नांदेडमधील प्रकार दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पण, यात राजकारण केलं जात आहे ते आणखी दुर्दैवी आहे. ज्यांना मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची सवय लागली आहे. त्यांच्याकडून आपण अधिक काही अपेक्षा करु शकत नाहीत, असं प्रत्युत्तर शिंदे यांनी दिलं आहे.

कोरोना काळात डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, तीनशे ग्रॅम खिचडी १०० ग्रॅमला देवून पैसे खाल्ले, ऑक्सिजन प्लॅटमध्ये पैसे खाल्ले. हे बाहेर येत असल्याने लक्ष हटवण्यासाठी सीबीआयची मागणी केली आहे. ही मागणी चांगली आहे. यामध्ये कोरोना काळातील नक्की चौकशी होईल. औषधांची खरेदी चुकीच्या प्रकारे केली असेल तर त्याचीही चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

नांदेडच्या प्रकरणाची देखील चौकशी सरकार करत आहे. कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असं शिंदे म्हणाले. कोरोना काळात तोंडावर मास्क लावून फेसबुक लाईव्ह घरात बसून करत होते, आम्ही रस्त्यावर उतरुन काम करतो. पीपीई कीट वापरुन हॉस्पिटलमध्ये गेलो. तेव्हा हे लोक घरात बसले होते. अशा प्रकारचे मुख्यमंत्री जगाने पाहिले नाहीत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

ठाकरे घरात बसून पैसे मोजत बसले होते. कोरोना काळात त्यांचा खरा चेहरा समोर आला. मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचाराचे पैसे कुठे गेले हे बाहेर येईल. नगरसेवक देखील घरात बसून काम करु शकत नाही. त्यामुळे घरात बसून काम करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. एक फूल आणि एक हाफ यांनी आम्हाला सांगू नये, अशी टीका शिंदे यांनी केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT