Eknath Shinde  
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : "जाहिरात चुकली असेल तर...", एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दिलं लटकं स्पष्टीकरण

Sandip Kapde

Eknath Shinde : शिवसेनेने वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. एका सर्व्हेनुसार शिंदे यांच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याची दावा केलाय त्यामुळे भाजपच्या गोटात देखील नाराजीचे वाचावरण आहे. दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी बोललो आहे. शिंदे आणि फडणवीस दोघांना मिळून लोकांनी पसंती दिली आहे. हा सर्व्हे महायुतीचा म्हणून आहे. हा एकत्र सर्व्हे आहे.

जाहिरातीवर बाळासाहेब ठाकरे, भाजप, फडणवीस यांचा जाहीरातीवर फोटो नाही, यावर दिपक केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, चुकीने जाहीरात गेली असेल. जाहिरात देताना एखादी चूक झाली असेल तर ती सुधारल्या जाऊ शकते. भाजप आणि शिवसेनेत वाद नाहीत. केणीतीरी फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.

एकनाथ शिंदे आणि फडणवीस मिळून ५९ टक्के जिंकून येण्याची शक्यता आहे. दोघे भावाप्रमाणे काम करतात. युतीत कुठलाही वाद नाही. कोणीतरी आग लावण्याचे काम करत आहे, असे दिपक केसरकर म्हणाले.

ती जाहीरात मी दिलेली नाही. चुकीची जाहीरात गेली असेल तर चौकशी करण्यात येईल. यावर खुलासा करण्यात येईल, असे देखील केसरकर यांनी स्पष्ट केले.

जाहिरातीत काय म्हटले-

आज, १३ जून रोजी राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रात राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशा टॅगलाइन खाली पानभर जाहिरात देण्यात आली आहे.

या जाहिरातील महाराष्ट्राती २६.१ टक्के जनतेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र हवेत तर देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के लोकांची पसंती असल्याचे एका सर्व्हे मध्ये समोर आल्याचे या शिवसेनेच्या जाहिरातीमध्य म्हटले आहे. या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंपेक्षा तब्बल तीन टक्के मते कमी मिळाल्याचे सांगण्यात आलं आहे.

इतकेच नाही तर महाराष्ट्रातील जनतेने ४९.३ टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शवल्याचे देखील या जाहीरातीमध्ये म्हटले आहे. दरम्यान फडणवीस आणि शिंदे यांची या जाहिरातीमध्ये एकंदरीत तुलना करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हो की नाही एवढंच बोला! मला बोलायचंय म्हणणाऱ्या वाल्मिक कराडला कोर्टानं फटकारलं; सुनावणीत काय घडलं?

Team India WTC Final Scenario: टीम इंडिया फायनलमध्ये जाणार की नाही? ICC ने सोपं गणित मांडून गुंता सोडवला की वाढवला?

Jalgaon Gold And Silver Price : खिसा रिकामा होणार! डिसेंबरच्या २१ दिवसांतच सोने ५५०० रुपयांनी तर चांदी २७ हजारांनी महागली

Viral Video: इथं कधीही फोटो काढू नका… क्षणात गिळंकृत करणारा पृथ्वीवरील जीवघेणा स्पॉट, इथं उभं राहणंही धोकादायक

Maharashtra’s Traditional Jewelry: महाराष्ट्रातील पारंपरिक दागिने तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT