Sanjay Raut on  esakal
महाराष्ट्र बातम्या

"अब तक सिर्फ छप्पन, और भी आगे जायेंगे"; वर्धापनदिनी राऊत म्हणाले...

आज शिवसेनेचा ५६ वा वर्धापनदिन असून शिवसेनेसारख्या असंख्य प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवर देश उभा आहे असं संजय राऊत म्हणाले

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेनेचा आज ५६ वा वर्धापन दिन आहे. तर उद्या विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते. शिवसेनेच्या स्थापनेनंतर देशभरात प्रादेशिक पक्षांच्या स्थापना व्हायला लागल्या. शिवसेनेचे "अब तक सिर्फ छप्पन, और भी आगे जायेंगे..." असं मत शिवेसनेचे संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

(Sanjay Raut On Shivsena Foundation Day)

"भूमीपुत्रांची जी भूमिका होती ती भूमिका घेऊन शिवसेनेची स्थापना झाली. आणि तीच भूमिका घेऊन देशभरात प्रादेशिक पक्षांची स्थापना झाली. याच प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवर देश उभा आहे. याचं श्रेय शिवसेनेला द्यावं लागेल. आज तीच शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचली आहे." असं संजय राऊत शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बोलताना म्हणाले आहेत.

"देशभरात शिवसेना हिंदुच्या न्याय आणि हक्कासाठी लढत आहे, आणि वर्धापनदिनाच्या मुहूर्तावर आज पक्षप्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. ते काय बोलतील याच्याकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे. तसेच कोणताही राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांच्या मदतीशिवाय पुढे जाऊ शकत नाही ही ताकद प्रादेशिक पक्षांची आहे. आणि शिवसेनेला याचं सर्व श्रेय जातं. शिवसेनेचे अब तक सिर्फ छप्पन, और भी आगे जायेंगे..." असं राऊत म्हणाले.

विधानपरिषदेच्या निवडणुका उद्या होणार असून महाविकास आघाडीचे दोन मत कमी करण्यासाठी भाजपकडून खेळी खेळली जात आहे. त्यांनी आमच्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख या सदस्यांना कोणत्या अधिकाराखाली मतदानाचा अधिकार नाकारला ? असा सवाल त्यांनी केला आहे. या खेळीमुळे देशाची न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.

दरम्यान उद्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे सहा उमेदवार तर भाजपचे पाच उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. आमदारांचा घोडेबाजार होऊ नये यासाठी सर्व पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Pune News: पुणेकरांना गुंठेवारीत दिलासा नाही! मुदतवाढ मिळाली, पण शुल्कात कपात नाही; जुन्याच दराने नियमितीकरण

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT