महाराष्ट्र बातम्या

Yakub Memon: याकूब मेमनच्या चुलतभावासोबत फडणवीस, राज्यपालांचा फोटो! पेडणेकरांचा भाजपवर पलटवार

षडयंत्र केलेल्या चिखलात ते स्वत: पडतील

अंकिता खाणे (Ankita Khane)

याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीचे प्रकरणी फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी याकूब मेमनचा चुलत भाऊ रऊफ मेमनसोबत एक बैठक घेतल्याचा आरोप करत संबंधित बैठकीचा व्हिडीओ भाजपने प्रसिद्ध केला आहे.यामुळे शिवसेना आणि मेमन यांचे संबध तपासा आणि चौकशी करा अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे. यावर भाजप नेते आणि रऊफ मेमन यांचे फोटो व्हिडिओ दाखवत पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

दुसरीकडे भाजपने केलेले आरोप फेटाळत महापौर असताना धार्मिक स्थळांच्या तक्रारी ऐकण्यासाठी मी गेले होते. बैठकीला कोण कोण उपस्थित होते, याची मला कल्पना नाही. आम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र आखलं जात आहे, असा पलटवार किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

अशातच किशोरी पेडणेकर यांनी याकूब मेमनचा चुलत भाऊ रऊफ मेमन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी याची भेट घेतल्याचे फोटो आणि व्हिडीओ दाखवून यावर काय बोलाल असा उलट प्रश्नही उपस्थित केला आहे. भाजपवर पलटवार करत मध्यमांसमोर फोटो आणि व्हिडीओ दाखवले आहेत. तसेच सामान्य घरातील लोकाना बदनाम करू नका अशी हाथ जोडून विनंती केली आहे.

आरोप करणाऱ्या भाजपच्या बारा तोंडांनी या फोटोला कॅप्शन द्यावे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. तर, काँग्रेसने रऊफ मेमन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोटो ट्वीट केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठीचा आदर राखत अभिनेत्याने जिंकली कानडी मने

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT