sanjay raut sakal
महाराष्ट्र बातम्या

नारायण राणेंकडून पश्चिम बंगालचा अपमान; संजय राऊतांची टीका

कार्तिक पुजारी

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि नारायण राणे यांच्यावर टीका केली. केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून पश्चिम बंगालचा अपमान केला जात असल्याचं ते म्हणाले आहेत

मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि नारायण राणे यांच्यावर टीका केली. केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून पश्चिम बंगालचा अपमान केला जात असल्याचं ते म्हणाले आहेत. देशाच्या स्वातंत्र्या संग्रामात पश्चिम बंगाल, महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही असं नारायण राणे म्हणाले. क्रांतिकारांची भूमी असलेल्या पश्चिम बंगालचा अपमान त्यांनी केला आहे. केंद्रीय मंत्र्याने महाराष्ट्राचाही अपमान केला आहे. ज्या मंत्र्याला स्वातंत्र्य लढ्यातील राज्यांचे योगदान माहिती नाही, तो आम्हाला पंधरा ऑगस्ट काय आहे हे आम्हाला शिकवत आहे? त्यांनी इतिहास वाचावा. भाजपने त्यांच्या नेत्यांना इतिहासाचे पुस्तक द्यावे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचा इतिहास मोठा आहे. शिवाजी महाराजांपासून पश्चिम बंगालमध्ये राजा राममोहन रॉय, बिपिनचंद्र पाल, सुभाषचंद्र बोस आणि ममता बॅनर्जींपर्यंत लढणारे लोक आहेत. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे आहेत. थोडा इतिहास समजून घ्या, जाणून घ्या. त्यानंतर आमच्यासोबत चर्चा करायला बसा. आमच्यासोबत सामना करणे अवघड आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

भारतात जसे बांगलादेशी घुसतात आणि देश खराब करण्याचा प्रयत्न करतात. तसं भाजपमध्ये बाहेरचे लोक घुसले आहेत. भाजपने हिंदूत्वासाठी मोठं काम केलं आहे. आम्ही त्या पक्षासोबत २५ वर्ष काम केलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपायी यांचे काय संबंध आहेत हे सर्वांना माहिती आहेत. पण, ज्यांना हे माहिती नाही ते बाहेरून आले आहेत. ते शिवसेनेवर चिखल उडवत आहेत, असंही राऊत म्हणाले.

राजकारणात वैचारिक मतभेद असतात. पण, नारायण राणे यांनी जी सुरुवात केली आहे ती वैचारिक मतभेद नाही 'जाती दुष्मणी' आहे. तुम्ही यासाठी काम करु नका, देशासाठी काम करा. राज्यासाठी काम करत राहा. तुम्ही तुमचं म्हणणं संसदेत, माध्यमांसमोर ठेवू शकता. तुम्ही जनआशीर्वाद यात्रा काढत आहात. इतर राज्यातही ही यात्रा सुरु आहे. पण, दुसऱ्या कोणत्या राज्यात असा वाद सुरु आहे का? तुमच्यात एवढीच गरमी असेल तर दिल्ली सीमेवर जा. शेतकऱ्यांसोबत बोला, असं म्हणत राऊतांनी टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांसाठी ‘जॅकपॉट’! IPL 2026 चा थरार गहुंजेत… युवा खेळाडूंच्या संघाचं होम ग्राऊंड! 2022 नंतर पहिल्यांदाच...

Zilla Parishad Election : अखेर ठरलं! जिल्हा परिषद निवडणूक होणार जाहीर, प्रशासकीय कामांना गती; सोमवारी घोषणा शक्य

Sangli Crime : तेच ठिकाण वेळही तीच, बदला घेतलाच! कॉलेजच्या दारातच तरुणावर चाकूने 14 सपासप वार; मांडी, डोके, हात, पोटावर घाव

Pune News:'पेरणे फाटा येथे ऐतिहासिक विजयस्तंभास वंदन'; लाखो आंबेडकरी अनुयायांचा उसळला जनसागर, रात्री उशिरापर्यंत अखंड रांगा!

Solapur Crime: साेलापुरात तृतीयपंथीचा खून, तिघांना पाच दिवसांची वाढीव कोठडी; तपासात धक्कादायक माहीती आली समाेर..

SCROLL FOR NEXT