ajit pawar poliical news  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'अजित पवारांसारखं कोणी येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू', शिंदे गटाच्या नेत्याचं वक्तव्य

शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार सातत्याने अजित पवारांबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. राज्यात पक्ष बदलाचे वारे वाहू लागल्याचे दिसून येत आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपात जातील अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. सत्ताधारी भाजपा नेते आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार सातत्याने अजित पवारांबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, अजित पवार अलिकडेच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटले असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, अजित पवार भाजपा किंवा महायुतीत येणार आहेत का असा प्रश्न विचारल्यानंतर शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, 'अजित पवार यांच्यासारखं कोणी महायुतीत येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू'.

पुढे शंभूराज देसाई म्हणाले की, 'भाजप आणि आमचं २०० प्लस जागा जिंकण्याचं टार्गेट सेट आहे. त्यामध्ये अजित पवारांसारखं कोणी येत असेल तर त्यांचं स्वागतच आहे. भाजपा, शिवसेना, आरपीआय, इतर मित्रपक्ष आणि अपक्ष अशी आमची महायुती आहे. ही महायुती अधिक भक्कम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यात आणखी कोणी येणार असेल तर त्यांचं स्वागतच आहे'.

शिंदे गटातील प्रमुख नेते शंभूराज देसाई म्हणाले की, आम्ही (भाजप आणि शिवसेना) आगामी विधानसभा निवडणूक २०२४ साठीचं लक्ष्य तयार केलं आहे. आम्हाला २०० पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. या जागा २०० पेक्षा जास्त, म्हणजेच २२५ किंवा २५० करण्यासाठी कोणी आम्हाला मदत करणार असेल, अधिक जागा निवडून आणण्यासाठी पाठिंबा देणार असेल, तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. सध्या आम्ही २०० आमदार निवडून आणण्याचं लक्ष्य ठेवलं आहे' असंही ते पुढे म्हणाले आहेत.

राज्यात घडामोडींना वेग

राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, तर दुसरीकडे भाजपचे दोन मोठे नेते तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. अजित पवार यांचा आज पुणे दौरा ठरला होता, परंतु ते अद्याप मुंबईतच आहे, अशी माहिती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये आहे. अजित पवार यांचे अचानक सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT