Sheetal Mhatre Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sheetal Mhatre: ‘त्या’ व्हिडीओवर शीतल म्हात्रे संतप्त; म्हणाल्या, स्त्रीच्या चारित्र्यावर…

शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे अन् आमदार प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ व्हिडीओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.

"जेव्हा काहीच सूचत नाही तेव्हा स्त्रीयांच्या चारित्र्यावर बोललं जातं. तिला कमी लेखून तिचं राजकारणामध्ये खच्चीकरण केलं जातं. राजकारणात मला यापूर्वीही असे अनुभव आले आहेत. आताच्या प्रकारामागे कोण आहेत याचा आणि त्याच्यामागच्या डोक्याचा पोलीस शोध घेतीलच," असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

शीतल म्हात्रे यांनी फेसबुकवर एका व्हिडीओच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच या घटनेचा निषेधही त्यांनी यावेळी नोंदवला आहे. एक महिला जेव्हा राजकारणात काम करत असते तेव्हा तिला अनेक गोष्टींना सामोरे जावं लागत असतं. मी जेव्हा राजकारणात काम करत होते. तेव्हा काही वर्षापूर्वी मला राजकारणातही वाईट अनुभव आलेत. पुरुष जो विचार असतो तो कसा असतो, एखादा पुरुष राजकारणी स्त्रीला कसा वागवतो, याचा मला अनुभव आल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या कि, माझ्या आत्मसन्मानासाठी मी माझा जीव आणि करिअर पणाला लावलं. आज त्याच स्त्रीबद्दल बोलण्यासाठी काहीच नसेल, ती ज्या पद्धतीने काम करते ते कुठं तरी खटकत असतं. एखादी स्त्री एवढ्या चांगल्या प्रकारे कसे काम करू शकते? याचा प्रश्न काही लोकांना पडतो. मग तिला अडकवण्यासाठी वेगवेगळे विचार सुरू होतात. काहीच सूचलं नाही तर मग तिच्या चारित्र्यावर बोलणं अतिशय सोपं असतं. तेच विरोधक करत आहेत, अशी संतप्त भावना शीतल म्हात्रेंनी व्यक्त केली आहे.

तर इतक्या खालच्या पातळीचे विचार कुणी करू शकतं? एखाद्या स्त्रीला घरंदाज स्त्रीला अशा पद्धतीनं बोलणं आणि व्हिडीओ टाकणं वेदना देणारं आहे. हे करणारं कोण आहेत. सर्वांना माहीत आहे. विरोधक किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात स्त्रीला बदनाम करू शकतात. भावा बहिणीचं नातं असलेल्या अशा एखाद्या स्त्रीला आणि पुरुषाला समाज विकृत नजरेने बघतो.

याच्या मागे कुणाचं डोकं आहे आणि कोण आहे हे आम्हाला माहीत आहे. कारण त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते या पातळीवर आले आहे. पोलीस याचा योग्य तो तपास करतीलच. संबंधित व्यक्ती आणि त्याच्या मागच्या डोक्याचा पोलीस शोध घेतीलच. एखाद्या स्त्रीबद्दल बोलणं हे महाराष्ट्राच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांना आणि संस्कारांना शोभत नाही, अशा तिखट शब्दात म्हात्रे यांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT