Uddhav Thackeray Smita Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : "तुम्ही वारसदार मग आम्ही कोण?" एकनाथ शिंदेंचं कौतुक करत स्मिता ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

एकनाथ शिंदे सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आहेत, असंही स्मिता ठाकरे म्हणाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Smita Thackeray News: बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाई स्मिता ठाकरे यांनी शिंदे गटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानंतर आता त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरेंवर टीका केली असून एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं आहे. आम्हाला असाच मुख्यमंत्री पाहिजे हवा होता, असं स्मिता ठाकरे यांनी म्हटलं आहे.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमामध्ये स्मिता ठाकरे बोलत होत्या. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला आणि शहीद जवानांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे.

स्मिता ठाकरे म्हणाल्या, "एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सर्वात लाडके मुख्यमंत्री आहेत. ते सतत काम करत असतात, झोप, वेळ काळ काही नाही, फक्त काम त्यांच्या डोक्यात असतं. ते फक्त तीन तास झोपतात. त्यांचा दिवस इतक्या लवकर सुरू होतो आणि उशिरा संपतो. त्यांच्या कामात गती आहे, त्यामुळे ते सर्वांचे लाडके मुख्यमंत्री झालेत."

उद्धव ठाकरेंना टोला लगावत स्मिता ठाकरे म्हणाल्या, "शिंदे एवढे उपक्रम हाती घेतात, महिलांसाठी काम करतात, बाल विकासासाठी काम करतात. ही काय खायची गोष्ट नाही. त्याला फक्त एक आवड लागते. एकनाथ शिंदेंना आम्ही खूप वर्षांपासून ओळखतो. हे त्यावेळचे एकनाथ शिंदे जेव्हा ते साहेबांचे शिलेदार म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आज बारा बाय बाराच्या खोलीतून वर्षावरचा जो प्रवास आहे, तो काही साधा नाही. त्यामागे काही खडतर प्रयत्न आहे, त्यामुळे ते आज या खुर्चीवर आहेत. आम्हाला असाच मुख्यमंत्री हवा होता. नुसतं वारसदार, वारसदार करुन चालत नाही. तुम्ही वारसदार मग आम्ही कोण?"

स्मिता ठाकरे पुढे म्हणाल्या की, शिंदे साहेबांनी तळागाळातून काम केलं, ते लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या शोधतात, त्यांच्यावर उपाय करतात. आपल्या सहकाऱ्यांना कामाला लावतात आणि लोकांची कामं झाली पाहिजेत असं सांगतात. मी अगदी जवळून पाहिलंय साहेबांना कुठलंही काम असेल तर एकनाथ शिंदेंना सांगा होऊन जाईल, असं म्हणत. एकनाथ शिंदेच खंदे शिवसैनिक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

AI मुळे १ अब्ज लोकांचा मृत्यू? बिल गेट्स यांचा गंभीर इशारा, नेमकं काय सांगितलं?

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे आदेश

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

SCROLL FOR NEXT