महाराष्ट्र बातम्या

...म्हणून शांत! नाहीतर राणेंचं तोंड दोन मिनिटात बंद करु!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एकेरी भाषेत बोलत आहेत. त्याला जशास तसे उत्तर देण्याची आणि त्यांचे तोंड बंद करण्याची ताकद आमच्यात आहे. मात्र, आम्ही संयमी आहोत आणि आम्हाला संयम पाळण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. म्हणूनच आम्ही शांत आहोत. मी दहा वेळा सांगितले आहे, मी आधी शिवसैनिक आहे, नंतर मंत्री, अशा शब्दात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना इशारा दिला.

देसाई म्हणाले की, नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केले. अन्यथा ते कधीच त्या पदापर्यंत पोहोचले नसते. त्यांच्या बाबतीत, त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री पद हे एक घटनात्मक पद आहे. त्या पदावरील व्यक्तीबद्दल एकेरी भाषेत बोलणे, हे राणेंसारख्या व्यक्तींना शोभत नाही. आम्ही संयमी आहोत आणि आम्हाला संयम पाळण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. म्हणूनच आम्ही शांत आहोत. नाही तर त्यांना तशाच भाषेत उत्तर देऊन त्यांचे तोंड बंद करण्याची हिंमत आम्हा शिवसैनिकांत आहे.

मी दहा वेळा सांगितले आहे. मी अगोदर शिवसैनिक आहे, नंतर मंत्री! पण आम्हाला उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत, की या आपत्तीच्या परिस्थितीत लोकांच्या मदतीकडे लक्ष द्या, त्यांना अडचणीतून बाहेर काढा. पक्ष प्रमुखांनी आम्हाला शांत रहायला सांगितले आहे म्हणूनच आम्ही शांत आहोत, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्री राणे यांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: मराठी माध्यमातून बँक अधिकारी, अभियंता आणि पोलीस : आवटे कुटुंबाची भरारी

BMC Mayor : मुंबईचा महापौर खुल्या प्रवर्गातून, आरक्षण सोडत जाहीर; महायुतीला दिलासा

Municipal Corporations Mayor Reservation: महाराष्ट्रात 'या' महापालिकांमध्ये लाडक्या बहि‍णी होणार महापौर, आरक्षण सोडत जाहीर

सकाळ आणि पीएफआरडीए (पेन्शन निधि विनियामक और विकास प्राधिकरण) आयोजित निवृत्तीनंतरचे आयुष्य ‘अर्थपूर्ण’ करण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम 'पेन्शन ने प्रगती'.

Nashik Teacher Protest : नाशिकमध्ये शिक्षकांचा संताप! प्रलंबित मागण्यांसाठी उपसंचालक कार्यालयात 'महादरबार' गाजला

SCROLL FOR NEXT