Shiv Sena MLA Disqualification Case Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sunil Prabhu : शिंदेंच्या वकीलाशी भिडले अन्...खडतर परिस्थितीतही ठाकरेंसोबत सावलीसारखे उभे राहीले, सुनील प्रभू पात्र की अपात्र?

Shiv Sena MLA Disqualification Case : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता ‘शिवसेना कोणाची’ आणि ‘ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार की शिंदे गटाचे?’ याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेना पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या ऐतिहासिक राजकीय पेचावर आज(बुधवारी ता. १०) सायंकाळी चार वाजता निकाल दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता ‘शिवसेना कोणाची’ आणि ‘ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार की शिंदे गटाचे?’ याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी चार वाजल्यानंतर सुनावणार आहेत. मात्र, एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी बंड केलं तेव्हापासून आजपर्यंत ठाकरेंसोबत काही निष्ठावंत नेते राहिले, त्यापैकी एक म्हणजे ठाकरे गटाचे आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू.

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी शिंदे गटाचे वकील आणि ज्येष्ठ विधीज्ञ महेश जेठमलानी प्रश्नांचा भडिमार करत होते आणि समोर होते ते ठाकरे गटाचे आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू. मला इंग्रजी लिहिता वाचता येतं, पण मी मराठीमध्ये कॉन्फिडन्ट आहे असं प्रभूंनी ठणकावून सांगितलं आणि जेठमलानींच्या प्रत्येक बाऊंसरवर षटकार मारला. दिंडोशीमधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्या सुनील प्रभू हे अपात्र ठरणार का पात्र ठरणार याचा फैसला आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) करत आहेत. सुनावणीवेळी गड लढवणाऱ्या ठाकरे गटाच्या या शिलेदारावर आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यानंतर एक-एक आमदार खासदार त्यांच्यासोबत गुवाहाटीला जात होता. ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं होतं. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदारांनीही शिंदेंना साथ दिली. मात्र, त्याचवेळी आमदार सुनील प्रभूंनी ठाकरेंशी असलेली निष्ठा दाखवली. ते अगदी शिवसेना अपात्रता सुनावणीवेळी शिंदे गटाचे वकील आणि ज्येष्ठ विधीज्ञ महेश जेठमलानी यांच्यासोबतही भिडल्याचं दिसून आलं.

महेश जेठमलानी सुनील प्रभू यांच्यावर सुनावणीवेळी प्रश्नांचा भडिमार करत होते. त्यावेळी मला इंग्रजी लिहिता वाचता येतं, पण मी मराठीमध्ये कॉन्फिडन्ट आहे असं प्रभूंनी ठणकावून सांगत, जेठमलानींच्या प्रत्येक प्रश्नाचं सडेतोड उत्तर दिलं. दिंडोशी येथून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवून आमदार झालेले सुनील प्रभू आज पात्र ठरणार का अपात्र ठरणार याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत. सुनावणीवेळी वकिलांशी भिडणाऱ्या ठाकरे गटाच्या या निष्ठावंत शिलेदारावर आज सर्वांचं लक्ष असणार आहे.

कोण आहेत सुनील प्रभू?

सुनील प्रभू हे मुंबईतील गोरेगावजवळील दिंडोशी या मतदारसंघाचे आमदार आहेत. सुनील प्रभू यांनी 1992 साली खासदार गजानन कीर्तीकर यांचे पीए म्हणून काम केलं होतं. 1997 मध्ये त्यांनी आरे कॉलनीतून महापालिकेची निवडणूक लढवली आणि ते नगरसेवक झाले. त्यानंतर सलग चार वेळा ते महापालिकेत निवडून आले. त्यांनी सहा वर्षे शिवसेनेचे सभागृह नेता म्हणून काम पाहिलेलं आहे.

2014 साली दिंडोशी मतदारसंघातून सुनील प्रभू यांना आमदारकीचं तिकीट मिळालं. त्या निवडणुकीत भाजपच्या मोहित कंबोज आणि मनसेच्या शालिनी ठाकरे यांचा पराभव करत त्यांनी आमदारकी मिळवली. तर 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांचा पराभव करून ते दुसऱ्यांदा आमदार झाले. शिवसेनेच्या पक्ष प्रतोदपदी त्यांची निवड झाली होती.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने सुनील प्रभूंची प्रतोदपदावरून हाकालपट्टी केली आणि त्याजागी भरत गोगावले यांची निवड केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू असताना न्यायालयाने सुनील प्रभू यांचा व्हिप म्हणजे प्रतोद म्हणून निवड योग्य ठरवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

‘धुरंधर’च्या टीमची तब्येत बिघडण्याचं खरं कारण समोर; सेटवरील जेवण नाही तर लेहमध्ये पसरलेलं मोठं फूड कंटॅमिनेशन

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT