Mla Disqualification Case akal
महाराष्ट्र बातम्या

Mla Disqualification Case: शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज होणार सुनावणी, सुनावणीनंतर राहुल नार्वेकर करणार दिल्लीवारी

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी पार पडणार आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीशी संबंधित सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची ठाकरे गटाची मागणी होती. शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी आज दुपारी 2 वाजता होणार आहे.

जी -20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीमध्ये होणार असल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे सुनावणी एक दिवस आधी घेण्यात येत असल्याची माहिती आहे. याच प्रकरणात 13 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

शिवसेना अपात्र आमदारांची सुनावणीला विलंब होत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलं सुनावलं होतं. त्यानंतर या सुनावणीच्या घडामोडींना वेग आला आहे. 13 ऑक्टोबर रोजी शिवसेना अपात्र आमदारांच्या प्रकरणावर सुनावणी होणार होती. मात्र विधानसभा अध्यक्षांकडून या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ही सुनावणी आज पार पडणार आहे.

शिवसेना अपात्रतेसंबंधी एकूण 40 याचिका विधानसभा अध्यक्षांच्या समोर आल्या आहेत. या सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घ्या अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेक सुनावणी घेण्यासाठी विलंब करत असल्याचा आरोपही ठाकरे गटाने केला आहे.

दरम्यान, आमदार अपात्रतेसंदर्भात नबाम रेबिया केस लँडमार्क जजमेंट असून माझा निर्णय राज्याला न्याय देणारा असेल अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.

विधानसभा अध्यक्ष सुनावणीनंतर दिल्ली दौऱ्यावर

दरम्यान आज सुनावणी झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. जी-20 देशांच्या सभागृह अध्यक्षांच्या बैठकीसाठी ते दिल्लीला जाणार आहेत अशी माहिती आहे. राहुल नार्वेकर दिल्लीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mill Workers House: मुंबईसह ठाणे, मिरा-भाईंदरमध्येही घरे, गिरणी कामगारांसाठी म्हाडाचं मोठं पाऊल; जागेचा शोध सुरू

Gokul Election Politics : देवाभाऊंना बोला... मुश्रीफांना घ्या... गोकुळ बिनविरोध करा; राजेश पाटील यांचा शिवाजी पाटील यांना सल्ला, महाराजस्व कार्यक्रमात जुगलबंदी

Latest Live Updates Marathi : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, विद्यार्थी आंदोलनातील हिंसाचाराची SIT चौकशी

'एक अधिकारी, एक कार', सरकारी ताफ्यावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; गैरवापर आणि खर्च कमी होणार

Ambernath: १२व्या मजल्यावरून मांजरीला फेकलं, इसमाचं अमानुष कृत्य CCTVत कैद; अंबरनाथमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT