Bihar Train Accident: रेल्वे स्थानकात पोहोचण्यापूर्वीच भीषण अपघात, ४ प्रवाशांचा मृत्यू; तर ५० जण जखमी

बिहारच्या बक्सरमध्ये काल(बुधवारी) मध्यरात्री रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे
Bihar Train Accident
Bihar Train AccidentEsakal
Updated on

बिहारच्या बक्सरमध्ये काल(बुधवारी) मध्यरात्री रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून 200 प्रवाशी जखमी झाले आहेत. दिल्लीहून कामाख्याला (गुवाहाटी) जात असलेल्या नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसला बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला.

एक्सप्रेसचे 21 डबे रुळावरून घसरले. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. अपघातानंतर या ठिकाणी बचावकार्य सुरू असून ते अद्यापही सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, जीआरपी, आरपीएफ आणि रेल्वेचे कर्माचारी घटनास्थळी दाखल झाले.

Bihar Train Accident
Bihar Train Accident:बिहारमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना ! मोठ्या जीवितहानीची शक्यता, ७ ते ८ डब्यांचं नुकसान

बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील डीडीयू-पटना रेलखंडच्या रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त प्रवाशांना त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, अपघात का झाला याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. रेल्वे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

Bihar Train Accident
Telangana Vidhansabha Election : केसीआर यांचा राज्यात प्रचार सभांचा धडका; दोन मतदारसंघातून राहणार उभे

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ट्विट

या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ट्विट केलं आहे. बचावकार्य पूर्ण झालं आहे. सर्व डब्यांची माहिती घेतली आहे. प्रवाशांना पुढील प्रवासासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटमध्ये दिली आहे.

रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी

रेल्वेने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. पटनासाठी- 9771449971, दानापूरसाठी 890569749 आणि आरासाठी- 8306182542 हेल्प नंबर जारी करण्यात आले आहेत. कंट्रोल रूमसाठी 7759070004 हा नंबर जारी करण्यात आला आहे.

Bihar Train Accident
High Court:मथुरा शाही ईदगाह मशीदीच्या खटल्यात हिंदू संघटनांना झटका, कृष्ण जन्मभूमीची मागणी हाय कोर्टानं फेटाळली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com