Shivsena MLA Disqualification Case Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena MLA Disqualification Case: ठाकरे अन् शिंदे गटाच्या 'या' आमदारांच्या भवितव्याचा आज निर्णय! संपूर्ण यादी एका क्लिकवर...

Shivsena MLA Disqualification Case : दीड वर्षांच्या काळानंतर आज शिवसेनेच्या एकूण 40 आमदारांच्या पात्र-अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज अंतिम निर्णय देणार आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याचे राजकारण ढवळून काढणाऱ्या आणि सत्तासंघर्षाच्या घटनेवरील सर्वात मोठा फैसला आज येणार आहे. या सत्तासंघर्षामध्ये शिवसेना शिंदे गटाचे 16 आमदार आणि ठाकरे गटाच्या 14 आमदार पात्र-अपात्रतेचा फैसला आज समोर येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज आपला निकाल सुनावणार आहेत. दोन्ही गटातील आमदारांच्या भवितव्याचा आज निर्णय येणार आहे.

तर शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यापैकी शिंदे गटाचे 16 तर ठाकरे गटाचे 14 आमदारांचा आहेत. आज कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरणार, विधानसभा अध्यक्ष कोणता निर्णय देणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना शिंदे गटाचे 16 आमदार

1) एकनाथ शिंदे

2) चिमणराव पाटील

3) अब्दुल सत्तार

4) तानाजी सावंत

5) यामिनी जाधव

5) संदीपान भुमरे

7) भरत गोगावले

8) संजय शिरसाठ

9) लता सोनवणे

10) प्रकाश सुर्वे

11) बालाजी किणीकर

12) बालाजी कल्याणकर

13) अनिल बाबर

14) संजय रायमूळकर

15) रमेश बोरनारे

16) महेश शिंदे

(16 MLAs of Shiv Sena Shinde group)

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार

1) अजय चौधरी

2) रवींद्र वायकर

3) राजन साळवी

4) वैभव नाईक

5) नितीन देशमुख

6) सुनिल राऊत

7) सुनिल प्रभू

8) भास्कर जाधव

9) रमेश कोरगावंकर

10) प्रकाश फातर्फेकर

11) कैलास पाटील

12) संजय पोतनीस

13) उदयसिंह राजपूत

14) राहुल पाटील

(Shiv Sena Thackeray group MLA)

21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार खासदार यांनी बंड केलं आणि आपल्या समर्थक आमदारांना घेऊन ते सुरतमार्गे गुवाहाटीला गेले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्याचवेळी शिंदेंनी भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री झाले. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगात गेला. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल देत पक्ष नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं.

त्यानंतर उध्दव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या अंतर्गत 16 बंडखोर आमदारांना अपात्र करा अशी याचिका ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली. त्यावेळी आपण खरी शिवसेना असल्याचा दावा करत शिंदे गटाने ठाकरेंच्या 14 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती.

यासंबधी सुनावणी घेत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाचा प्रतोद योग्य ठरवला तर, आमदारांच्या अपात्रतेसंबंधित निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना असल्याचं सांगितलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेण्यास विलंब करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. शेवटी 10 जानेवारीपर्यंत आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष आज शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT