Sharad Pawar-Udayanraje Rayat Shikshan Sanstha google
महाराष्ट्र बातम्या

'उदयनराजेंना रयतच्या बॉडीवर घ्या, शरद पवार आपोआप अध्यक्षपद सोडतील'

सकाळ डिजिटल टीम

सातारा : ''रयत शिक्षण संस्थेचे (Rayat Shikshan Sanstha) काम बारामतीच्या एकाच माणसाला दिलं जातं. पात्रता नसलेल्या लोकांना संस्थेच्या बॉडीवर घेतले आहे. याचे मला दुःख वाटते. या संस्थेत नोकरी लावण्यासाठी ४० लाख रुपये मागितले जात असल्याची चर्चा आहे'', असे गंभीर आरोप शिवसेना आमदार महेश शिंदे (Shivsena MLA Mahesh Shinde) यांनी केला. उदयनराजेंना (MP UdayanRaje Bhosale) बॉडीवर घ्या. शरद पवार स्वतः जनतेचा विचार करून रयतचं अध्यक्षपद सोडतील, असंही ते म्हणाले.

महेश शिंदे हे कोरेगावचे शिवसेना आमदार आहेत. पण, सरकारमधीलच घटकपक्षावर ते सातत्याने टीका करताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या मुद्द्यावर थेट शरद पवारांना टार्गेट केल्याचं दिसतंय. तसेच उदयनराजे यांची बाजू घेताना दिसतात. यावेळीही त्यांनी पवारांवर जोरदार टीका केली. ''रयत शिक्षण संस्थेचं खासगीकरण झालं आहे. संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयतची घटना लिहली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री संस्थेचे अध्यक्ष असावे, अशी भूमिका मांडली होती. मात्र, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली'', असे गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केले.

'उदयनराजेंना रयतच्या बॉडीवर घ्या' -

रयत संस्थेच्या मुख्यालयाला राजघराण्याने ही जागा दिली आहे. तरीही उदयनराजेंना रयतच्या बॉडीवर घेतले नाही. याबाबत राज्यातील जनतेत नाराजी आहे. फक्त राजकीय ताकदीमुळे ही संस्था ताब्यात घेतली असून हे चुकीचे आहे, असा आरोप करत उदयनराजेंना रयतच्या बॉडीवर घेण्याची मागणी शिंदे यांनी यावेळी केली.

शशिकांत शिंदेंनाही प्रत्युत्तर -

रयत शिक्षण संस्था आणि शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांनी आपली उंची तपासावी, असा सल्ला आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला होता. त्यालाही आमदार महेश शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. माझी उंची ६ फूट असून परवांची उंची माझ्यापेक्षा २ इंचाने मोठी आहे, असं महेश शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026 : केन विलियम्सन, LSG चा नवा मुख्य प्रशिक्षक? रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली आलेल्या अपयशानंतर संजीव गोएंका मोठा निर्णय घेणार

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Mumbai News: जलसाठ्यावर चिंतेचे ढग! सात तलावांत उरले फक्त १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

SCROLL FOR NEXT