संतोष बांगर e sakal
महाराष्ट्र बातम्या

राणेंच्या घरात घुसून कोथळाच बाहेर काढतो, सेना आमदाराचा तोल ढळला

भाग्यश्री राऊत

हिंगोली : स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane statement on cm uddhav thackeray) यांची जीभ घसरली होती. त्यावरून राज्यात शिवसेना आणि भाजपच्या (shivsena bjp dispute) कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झालेला पाहायला मिळाला. मात्र, याचवेळी राणेंवर टीका करताना हिंगोलीच्या सेनेच्या आमदाराचा तोल ढळला. त्यावरही आता राजकारण तापताना दिसत आहे. तसेच भाजप कार्यकर्ते याविरोधात तक्रार दाखल करणार आहेत.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याची भाषा केली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. नाशिकमध्येच रात्रीच राणेंविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सकाळीच नाशिक पोलिसांचे पथक राणेंना अटक करण्यासाठी रत्नागिरीकडे रवाना झाले. तोपर्यंत पुण्यात देखील राणेंविरोधात तक्रार दाखल झाली होती. यादरम्यान राज्यात शिवसैनिकांनी राडा घालायला सुरुवात केली. त्यांनी राज्यभर आंदोलने केली. मात्र, सेनेचे आमदार संतोष बांगर यांचा तोल ढळला. त्यांनी राणे यांचा कोथळा बाहेर काढण्याची गंभीर धमकी दिली. ते म्हणाले, 'पोलिसांना बाजूला करा, राणेंचा कोथळाच बाहेर काढतो. या हरामखोर नारायण राणेंना मला संदेश द्यायचा आहे. तू काय सांगतो. तुला कुठे यायचे हे सांगतो. तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. पोलिसांना जरा बाजूला करा. हा संतोष बांगर, शिवसेनेचा मावळा, छत्रपतींचा मावळा, तुला चारीममुंड्या येऊन चीत नाही केलं, तुझा कोथळा बाहेर नाही काढला, तर संतोष बांगर असं नाव सांगणार नाही', असे धमकीवजा विधान त्यांनी केले. त्यामुळे आता नवीनच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नारायण राणेंची टीका नेमकी कशावरून?

स्वातंत्र्यदिनाला भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यानंतरच्या भाषणामध्ये हा स्वातंत्र्याचा 'अमृतमहोत्सव की हिरकमहोत्सव' असा गोंधळ उडाला. त्यांच्यामागे उभे असलेले सचिव सीताराम कुंटे यांनी अमृतमहोत्सव असे सांगितले आणि त्यांचे भाषण पुढे सुरू झाले. त्यानंतर भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी महाड येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी 'हिरकमहोत्सव काय, मी असतो तर कानाखालीच चढवली असती' असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT