shivsena mla yamini jadhav and geeta jain join eknath shinde in surat 
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेला अजून एक धक्का, आमदार यामिनी जाधव सुरतेत दाखल

सकाळ डिजिटल टीम

सुरत : शिवसेनेत झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेमधून पाठिंबा वाढताना दिसत आहे. आमदार यामिनी यशवंत जाधव आणि आमदार गीता जैन या देखील सुमारे ३५ आमदाराना सोबत घेत सुरत गाठलेल्या एकनाथ शिंदे यांना सामिल झाल्या आहेत. (shivsena mla yamini jadhav and geeta jain join eknath shinde in surat)

यामिनी यशवंत जाधव या मातोश्रीच्या जवळच्या समजल्या जातात तर गीता जैन या शिवसेना समर्थक अपक्ष आमदार आहेत. या दोघी देखील एकनाथ शिंदे यांना सामिल झाल्याने शिंदेंना शिवसेनेतून पाठींबा वाढत असल्याचे चित्र तयार झाले आहे. दरम्यान यामिनी जाधव यांचे पती आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांची यापूर्वी ईडी आणि आयकर विभागाकडून त्यांची अनेकदा चौकशी करण्यात आल आहे. तसेच त्यांना अटकही केली जाऊ शकते.

जे आमदार आज नाहीयेत त्यांनी नियम पाळले नाहीत तर त्यांची आमदारकी रद्द होईल त्यांना निवडणूकीला सामोरे जावे लागेल, त्यांचे राजकीय करिअर संपुष्टात येईल. ते आमचे सहकारी आहेत, एकनाथ शिंदे सहकारी, मित्र आहेत. ते परत येतील असा आम्हाला विश्वास आहे, तसेच खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांना प्रेमाने परत या आम्ही तुमते स्वागत करू असे अवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Deadline 2026: जुलैमध्ये चुकवू नका या 3 महत्त्वाच्या टॅक्स डेडलाइन! नाहीतर भरावा लागू शकतो दंड

Latest Marathi News Live Update : मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी 2 दिवस रेड अलर्ट जारी

Pregnant Woman Rescue : टाकळीतील गर्भवतीचा जीवघेणा प्रवास! सुरुवातीला बांबूची झोळी, नंतर मालवाहतूक गाडी; शेवटी रुग्णवाहिकेतून दवाखान्यात

Virar News : क्षणात संदेश पोहचणाऱ्या डिजिटल युगात, 'देवाभाऊ तुम्हीच आम्हाला शिक्षण देऊ शकता'; पोस्टकार्ड पेटीत पत्र टाकून मुलांनी घातली भावनिक साद

Nashik Kumbh Mela 2027 : कुंभमेळा, पुलाच्या कामांसाठी 517 झाडे तोडण्यास मंजुरी; नाशिक महापालिकेच्या वृक्ष समितीचा मोठा निर्णय, 2 कोटींचा मेगा प्लॅन काय?

SCROLL FOR NEXT