Shivsena mp Gajanan Kirtikar join eknath Shinde group maharashtra Politics  
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: ठाकरे गटाची पडझड थांबेना! गजानन किर्तिकरांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरू झालेली शिवसेनीची पडझड अजूनही थांबताना दिसत नाहीये. उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून खासदार गजानन किर्तिकर हे देखील आता एकनाथ शिंदे गटात सामील होणार आहेत अशी चर्चा होती. त्यानंतर उद्दव ठाकरे यांना हा एक मोठा धक्का बसला असून, खासदार गजानन किर्तिकर यांनी एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे गजानन किर्तिकर यांनी प्रवेश केला, यानंतर आता शिंदे गटातील खासदारांची संख्या आता १३ वर गेली आहे. यामुळे ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसला आहे.

यापूर्वी देखील किर्तिकर हे शिंदे गटात जाऊ शकतात असे बोलले जात होते. दरम्यान किर्तिकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. काही वेळापूर्वी किर्तिकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी बैठक झाली होती. त्यानंतर काही वेळातच त्यांचा शिंदे गटात प्रवेश झाला आहे.

गजानन किर्तिकर कोण आहेत?

शिवसेनेचे जेष्ठ नेते किर्तिकर हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत, तसेच १९९० ते २००९ काळात ते चार वेळा आमदार देखील राहीले आहेत. युतीसरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. तसेत सलग दोन वेळा लोकसभा खासदार म्हणून त्यांची निवड झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: गर्भपातासाठी पतीची परवानगी नको! उच्च न्यायालयाचे एकाच दिवशी दोन मोठे ऐतिहासिक निर्णय, महिलांना मोठा दिलासा

Nagpur News: नागपूरात बोगस बांधकाम कामगार नोंदणी; दलालांचे धाबे दणाणले, नागपूर, वर्धा जिल्ह्यात कारवाई!

Shoumika Mahadik : शौमिका महाडिक जिल्हा परिषद निवडणूक लढवणार की नाही, ४ शब्दात कंडका पाडला...

CM Devendra Fadnavis : मुंबईत जन्माला येऊन तुम्ही काय केले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना सवाल

Prakash Ambedkar : 'भाजप सर्वात मोठा भ्रष्टाचारी पक्ष, अजितदादा-एकनाथ शिंदे त्यांच्या तालावर नाचताहेत'; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

SCROLL FOR NEXT