shivsena mp gajanan kirtikar on support to draupadi murmu in the presidential election  
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेचा द्रोपदी मुर्मूंना पाठिंबा? ठाकरे दोन दिवसात घेणार निर्णय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे 40 हून अधिक आमदारांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. दरम्यान या मोठ्या धक्क्यानंतर शिवसेनेचे खासदार देखील एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त समोर आले. मात्र शिवसेनेसोबत 19 पैकी 17 खासदार असल्याचं सांगण्यात समोर आलं आहे. यादरम्यान शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलवण्यात आली. या बैठकी नंतर शिवसेना खासदार गजाजन किर्तिकर यांनी प्रतिक्रिया दिली.

किर्तिकर म्हणाले , द्रोपदी मुर्मू यांच्याबद्दल उद्धव ठाकरे एक-दोन दिवसांत निर्णय घेतील, जरी NDA चा उमेदवार असला तरी एक आदिवासी महिला आहेत, त्यामुळे त्यांना शिवसेनेने मत द्यावे अशी मागणी सर्व खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, त्याबद्दल एक-दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, उध्दव ठाकरे तो लवकरच जाहीर करतील असेही त्यांनी सांगितले आहेत.

विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाल की शिवसेनेची सभागृहात १३ संख्या आहे, सत्ताधारी पक्षानंतर शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे शिवसेनेच्या विरोधी पक्षाला सभापती मान्यता देतील. दरम्यान त्यांनी सांगितले की सगळे उद्धव ठाकरे यांना भेटायला आलो होतो, संभाजीनंगर जिल्ह्यातील ९९ टक्के पदाधीकारी पक्षप्रमुखाच्या पाठीशी आहेत. सहा पैकी पाच लोकांनी गद्दारी केली आहे, पण शिवसैनिक जाग्यावर आहेत, पदाधिकारी शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत हे दाखवण्यासाठी आज पक्षप्रमुखांची भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत NDA च्या उमेदवार मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत उद्धव ठाकरे चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीला पाच खासदारांनी दांडी मारली होती. यापैकी संजय जाधव वारीला गेलेले होते. ते आजारी आहेत. त्यामुळे ते येऊ शकले नाही. तर संजय मंडलिक यांना दिल्लीला जावं लागलं. त्यांनी परवानगी घेतली होती. तसेच खासदार कलाबेन डेलकर पावसामुळे येऊ शकल्या नाहीत. तर खासदार भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे आले नाहीत. त्यामुळे शिवसेनेसोबत 19 पैकी 17 खासदार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे उद्धव टाकरे यांनी खासदारांचं बंड थोपवल्याची चर्चा सुरू झाली आहे..

मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा झाली. शिवसेनेच्या बहुतांशी खासदारांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासंदर्भात मत व्यक्त केल्याचं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नीट पेपरलीक प्रकरणाची चार्जशीटही लीक, साक्षीदारांची नावं बाहेर, कोर्टानं सुनावलं...

IPL 2027: हार्दिक पांड्या परत आला तर चालेल का? गुजरात टायटन्सची कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चा अन् मग...

Jantar Mantar Season 2: जंतर-मंतरचा ‘सीजन-२’ लवकरच! अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; यावेळी काय असणार? सौरव दासांनी सांगितला प्लॅन

मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; ५२७ पूरग्रस्तांचे रेस्क्यू, मुख्यमंत्र्यांकडून २४ तास मॉनिटरिंग

वसू आत्याची खेळी यशस्वी होणार! नंदिनीच्या खोट्या गरोदरपणाचं सत्य सगळ्यांसमोर येणार; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT