Sanjay Raut 
महाराष्ट्र बातम्या

भाजपच्या अहंकार, खोटारडेपणामुळेच राज्यावर ही वेळ : संजय राऊत 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपकडून सत्ता स्थापन न झाल्याबद्दल शिवसेनेतून दोष देणे चुकीचे आहे. भाजपच्या  अहंकार आणि खोटारडेपणामुळेच राज्यावर ही वेळ आली आहे. शिवसेनेवर याचे खापर फोडणे चुकीचे आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना आज (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला राज्यपालांना कळवावे लागणार आहे. त्यापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला लक्ष्य केले.

राऊत म्हणाले, की शिवसेनेला फक्त 24 तासांची मुदत दिली आहे. तर, भाजपला 72 तासांची मुदत दिली होती. सरकार बनविणे आमचे कर्तव्य आहे. अनेक जणांना एकत्र आणून सरकार बनविण्यासाठी वेळ लागतो. राज्याला राष्ट्रपती राजवटीकडे ढकलायचे यांनी ठरविल्याने आम्ही राज्याला स्थिर सरकार मिळण्यासाठी बांधील आहोत. भाजपच्या प्रमुख नेत्यांचे निवेदन मी ऐकलेले आहे. ते अत्यंत दुःखद आणि खेदजनक आहे. भाजप सत्ता स्थापन करू शकला नाही, याचे खापर शिवसेनेवर फोडणे चुकीचे आहे. जे ठरलं होते तसे झाले असते तर विरोधी पक्षात बसायची वेळ त्यांच्यावर आली नसती. त्यांच्यात प्रचंड अहंकार आहे. 50 टक्के काही देणार नाही, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर ही वेळ आली आहे. त्यांनी शिवसेनेला दोष देऊ नये. उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाटीपण्णी करू नये. ते खोटे बोलले, तेच राज्याचे गुन्हेगार आहेत. 

उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतर अरविंद सावंत हे राजीनामा देत आहेत. भाजप खोटारडं वागत असेल तर केंद्रात एका मंत्रीपदासाठी आम्ही का राहावे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार का, याबाबत तुम्हीच ठरवा, असे राऊत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: ''रुपाली चाकणकरच पीडितांना खरातकडे पाठवायच्या'', महिला नेत्याचे गंभीर आरोप, केली अटकेची मागणी

Builder Shot Dead in Kankavli : कणकवली हादरली! तरुण बांधकाम व्यावसायिकाच्या डोक्यात झाडल्या गोळ्या; मध्यरात्रीच्या 'त्या' वादाचा रक्तरंजित शेवट

नव्या मालिकांसाठी जुन्या मालिकांचा फुटबॉल; स्टार प्रवाहाच्या दोन मालिकांची वेळ बदलली; प्रेक्षक म्हणतात- त्यांना

Pune News: सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागप्रमुखांवर सक्तीच्या रजेची कारवाई: कुलगुरूंचे आदेश, अधिसभेत कारवाईचा धडका!

Mumbai Crime: प्रेयसीने ब्रेकअप केलं, तरुणाचा संताप अनावर, भररस्त्यात तरुणीला गाठलं अन्...; मुंबईत काय घडलं?

SCROLL FOR NEXT