sanjay raut-devendra fadnavis google
महाराष्ट्र बातम्या

'अजूनही यौवनात मी', फडणवीसांवर संजय राऊतांची मिश्किल टिप्पणी

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी 'मला अजूनही मुख्यमंत्री आहे, असं वाटतं' असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. त्यावरच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay raut) यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी स्वप्नात रममान व्हावे. त्यांची भावना योग्य आहे. त्यांनी चांगली स्वप्न पाहावी, असे संजय राऊत म्हणाले. आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नवी मुंबईतील बेलापूर येथे मंदा म्हात्रे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. ''तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही, की मुख्यमंत्री नाही. मी मुख्यमंत्रीच आहे, असं मला वाटतं. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाही. तो काय करतो हे महत्वाचं आहे'', असं फडणवीस म्हणाले होते. त्यावरूनच संजय राऊतांनी टीप्पणी केली आहे.

''कोणाला कधी-कधी वाटतं की अजूनही यौवनात मी. असं नाटक खूप गाजलं आहे. त्यामुळे फडणवीसांनी वाटत असावे की ते अजूनही मुख्यमंत्री आहेत. आम्हालाही दिल्लीत गेल्यानंतर वाटतं. त्यांची भावना योग्य आहे. त्यांनी स्वप्नात रममान व्हावे. प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. त्यांनी चांगली स्प्नन पाहावी. त्यांच्या पंखाना बळ मिळावं. त्यांच्या पंखात अधिक ताकद येवो. त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आहे'', असेही राऊत म्हणाले.

गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे जनतेनेही मला जाणवू दिलं नाही, असेही फडणवीस म्हणाले. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले ''राज्याचे विरोधी पक्षनेत्यांनी आम्ही नेहमी शाडो मुख्यमंत्री समजतो. त्यामुळे त्यांनी कायम त्या भूमिकेत राहावे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT