shivsena mp sanjay raut on Eknath shinde maharashtra political news
shivsena mp sanjay raut on Eknath shinde maharashtra political news  Sakal
महाराष्ट्र

..तर त्यांची आमदारकी रद्द होईल, राऊतांचा शिवसेना आमदारांना इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कथित बंडानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. शिंदे काही शिवसेनेच्या आमदारांसह सध्या सुरत येथील हॉटेलमध्ये आहेत. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (shivsena mp sanjay raut on Eknath shinde maharashtra political news)

खासदार संजय राऊत यांना आक्षेप घेतल्यानंतर आता सभागृहात संख्या बळ टिकेल का असे विचारलं असता, त्यांनी तुम्ही आकडे कसले मोजताय, विधानसभेत जेव्हा वेळ येईल तेव्हा आकडे मोजा. पुर्ण बहुमत सिध्द होईल असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जे आमदार आज नाहीयेत त्यांनी नियम पाळले नाहीत तर त्यांची आमदारकी रद्द होईल त्यांना निवडणूकीला सामोरे जावे लागेल, त्यांचे राजकीय करिअर संपुष्टात येईल. ते आमचे सहकारी आहेत, एकनाथ शिंदे सहकारी, मित्र आहेत. ते परत येतील असा आम्हाला विश्वास आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, आमदारांना मारहाण झाल्याची माहिती खरी असल्याचे त्यांनी सांगितले. ही गंभीर बाब असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यामध्ये लक्ष घालावं असेही राऊत म्हणाले.

पुढे बोलताना भाजपसोबत जावं या शिंदेच्या मागणीवर ते म्हणाले की ते पक्षाचं धोरण पक्ष ठरवतो, ते भाजपसोबत होते तेव्हा त्यांच्याकडं कोणती खाती होती? मविआ मध्ये त्यांची प्रतिष्ठा किती वाढली हे त्यांनी पाहावं. हा बाहाणा आहे, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत प्रेमानं परत यावं आम्ही त्यांचं स्वगत करू असेही राऊत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT