Shivsena MP Sanjay Raut Speaks at Press conference on Shivsena BJP 
महाराष्ट्र बातम्या

बाळासाहेबांनी आम्हाला शब्द पाळायला शिकवलं, पण... : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपने दिलेला शब्द पाळायला हवा, फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्यूलानुसारच मुख्यमंत्री पदाचंही समसमान वाटप व्हावं, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केली आहे. भाजपने युतीधर्माचे पालन करायला हवे. तसेच विनाशकाले विपरित बुद्धी ही आमची नाही, तर भाजपची अवस्था आहे, असेही राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

दिलेला शब्द पाळायचा ही बाळासाहेबांची शिकवण आहे. शिवसेनेने कोणतीही नरमाईची भूमिका घेतलेली नाही. जागावाटपाबाबत युतीत चर्चा होऊ शकते. अमित शहांच्या उपस्थितीत जी पत्रकार परिषद झाली होती, त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समसमान फॉर्म्यूला असेल असे म्हटले होते, आमचीही तीच मागणी आहे, मात्र आता ते त्यांचा शब्द पाळताना दिसत नाहीत. शिवसेना आमच्यासोबत येणार नसेल, तर आम्हाला इतर पर्याय खुले आहेत, असे भाजप म्हणू शकते, तर शिवसेनेकडेही इतर बरेच पर्याय आहेत, मात्र उद्धध ठाकरे असे कधीच करणाक नाहीत. आम्ही नेहमीच शब्द पाळतो. असे राऊत यांनी यावेळी सांगितले. 

शिवसेना-भाजपकडून अपक्षांची जुळवाजुळव 
मुख्यमंत्रिपदावरून एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेना-भाजपने अपक्षांना आपल्याकडे ओढण्यास सुरवात केली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी "मातोश्री' येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढून 62 वर गेले असून, भाजपकडे 112 आमदार आहेत. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली असताना मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे. "फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युल्यावरून भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा होत आला तरी, या दोन्ही पक्षांची एकही संयुक्त बैठक झालेली नाही. दोन्ही पक्षांकडून अपक्ष आमदारांना खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT