Sanjay Raut 
महाराष्ट्र बातम्या

काँग्रेस हा महाराष्ट्राचा शत्रू नाही : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपचा बहुमत विकत घेण्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. भाजपने त्यांना राज्यपालांनी दिलेल्या संधीचा लाभ घ्यावा. तुम्ही कोणालाही विकत घेऊ शकत नाही. राज्यात स्थिर सरकार येण्यासाठी काँग्रेसने भूमिका घेतली असेल तर काँग्रेसच्या भूमिकेचे राज्यातील जनता स्वागत करेल. काँग्रेस हा महाराष्ट्राचा शत्रू नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला निमंत्रण दिले आहे. यासंदर्भात आज भाजपची बैठक होत असताना त्यापूर्वीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्याजवळ बहुमत असेल तर त्यांनी सत्ता स्थापन करावी, असेही म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले, की भाजपकडे आत्मविश्वास आहे, म्हणून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात येत आहे. त्यांनी बहुमत सिद्ध करावे. कोणीही सत्तेचा दावा न केल्यास आम्ही जबाबदारी घेऊ. जनादेश स्वीकारण हे आमचं कर्तव्य आहे. महाराष्ट्रात काँग्रेस हा आमचा राजकीय वैरी नाही. प्रत्येक राजकीय पक्षात मतभेद असतात. आमचे भाजपसोबतही मतभेद होते. राज्याच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रात मोठे योगदान आहे. बेळगाव-कारवार मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार ज्या आबदीने बोलतात तसे भाजप बोलताना दिसत नाही. डील करण्यासाठी आम्ही व्यापारी नाही. आज उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्धव ठाकरे आमदारांच्या भेटीला जाणार आहेत. उद्धव ठाकरे योग्यवेळी निर्णय घेतील. राज्यात भयाची स्थिती निर्माण झाली होती. ती संपलेली आहे. आता पैशाच्या जोरावर कोणी कोणाला विकत घेऊ शकत नाही. राम मंदिराचा मुद्दा कोणत्या एका पक्षाचा नाही. देशाचा मुद्दा आहे. शिवसेनेचे मोठे योगदान यामध्ये आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT