Shivsena  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाला मिळताच ठाकरे पिता पुत्रांचे हटवले फोटो

संसदेतील शिवसेना कार्यालयाचे चित्र बदलले

सकाळ डिजिटल टीम

संसदेतील शिवसेना कार्यालयाचे चित्र बदलल्याचं दिसून येत आहे. संसदेतील शिवसेना कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो गायब झाल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटो ऐवजी एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आले आहेत.

याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. संसदेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो शिवसेना संसदीय कार्यालयात लागल्याचे दिसून येत आहे.

संसदेतील शिवसेना कार्यालयाचे चित्र बदलण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो भिंतीवरून हटवण्यात आले आहेत. त्याऐवजी आता एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे लावण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर गल्ली ते दिल्ली फरक जाणवू लागला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे यांनी ताबा घेतला त्यानंतर आता हा बदल दिसून आला आहे. आधी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो होते. आधीच्या रचनेतून या दोघांचे फोटो काढण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane Retirement: भारतीय क्रिकेटला मोठा धक्का; माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

'मुलीच्या घराबाहेर थांबा' म्हणणं अल्लू अर्जुनला पडलं महाग; 'स्टॉकिंगला प्रोत्साहन' दिल्याचा आरोप करत केलं ट्रोल

Solapur News: मोहोळमध्ये तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवले; तरुणी बँक कर्मचारी अन् काय घडलं..

Latest Marathi News Live Update : पुण्यात संगमवाडी पार्किंग क्रमांक तीन जवळ एक कारचा अपघात

Pune Car Accident: पुण्यात भीषण अपघात! झाडाला एवढी जोरदार धडक की उन्मळून पडले, कारचा चक्काचूर... चालक स्टेअरिंगमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT