Eknath Shinde News Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Row : "आता आम्हाला शिवसेना म्हणायचं"; शिंदे गटाने पत्रक काढत केलं जाहीर

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. यानंतर आता शिंदे गटाकडून एक पत्रक काढण्यात आलं आहे.

निवडणुकीच्या निर्णयानुसार पक्षाचे नाव व चिन्ह शिंदेंना मिळाले असून या पुढे माध्यमांनी शिंदेगट न उच्चारता 'शिवसेना' असे उच्चारावे, असं पत्र पक्ष सचिव संजय मोरे यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे.

शिवसेनेतला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या वादाचा चेंडू निवडणूक आयोगाकडे टोलवला होता. त्यामुळे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार, याचा निर्णय अनेक दिवस प्रलंबित होता. त्यानंतर आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर मशाल हे चिन्ह दिलं आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल हे चिन्ह दिलं.

या चिन्हांवर आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व इथल्या जागेसाठीची पोटनिवडणूक झाली. यानंतर आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला आणि शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT