Uddhav Thackeray on election comission esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena News: "हे कुणाचं ते कुणाचं सांगू नका"; उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला झापलं!

उद्धव ठाकरेंनी चिन्ह व नाव जाण्याची कुणकूण लागताच १५० कोटींचा पक्षनिधी वळवल्याची चर्चा आहे.

सकाळ डिजिटल टीम

Uddhav Thackeray News: शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंकडे दिलं आहे. या निर्णयाची कुणकूण लागताच उद्धव ठाकरेंनी पक्षनिधी इतर खात्यांत वळवल्याची चर्चा आहे. याबद्दल उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका मांडली. पक्षनिधीबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, "पक्षनिधीचा दावा ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही.

नाहीतर निवडणूक आयोगावर खटला भरला जाईल. आयोगाला फक्त चिन्ह व नाव ठरवण्याचा अधिकार नाही तर देशात निवडणुका घेणं, पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवणं हा त्यांचा अधिकार आहे".

पक्ष निधी बाबतीत निवडणूक आयोगाचा अधिकार नाही हे कुणाचं ते कुणाचं हे निवडणूक आयोग सांगू शकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पक्षाचे नाव आणि चिन्ह जाणार याची कुणकुण उद्धव ठाकरेंना आधीच लागली होती. शिवसेनेच्या पक्षनिधीवरही शिंदे गटाकडून दावा केला जाऊ शकतो, हे ओळखून पक्षनिधीची रक्कम अन्य बँक खात्यात वळविल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा पक्षनिधी सुमारे १५० कोटींचा असण्याची शक्यता आहे, अशी माहितीही हाती येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : मुलीशी बोलण्याच्या कारणावरून तरुणाचा खून; कोथरूडमधील सहा आरोपींना अटक

बारावी बोर्ड परीक्षेला आखाती युद्धाचा फटका, CBSEने ७ देशात परीक्षाच केली रद्द

अंबरनाथ पालिकेत मोठे फेरबदल, पंकज पन्हाळे नवे शहर अभियंता; राजेश तडवींकडे उपअभियंता पदाची धुरा

Latest Marathi Live Update : FASTag वार्षिक पास आता महागला! १ एप्रिलपासून अंमलबजावणी

Cricket Retirement: भारताला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी कर्णधाराची निवृतीची घोषणा; म्हणाला, बाबर आझमसारखा...'

SCROLL FOR NEXT