sanjay raut sanjay raut
महाराष्ट्र बातम्या

'ज्यांनी गद्दारी केली, त्यांची यादी आमच्याकडे... पाहून घेऊ!'

राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झालेला आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झालेला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांना बोलताना भाजपवर टीका केली आहे. मत मिळवण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर केला जातो आणि निवडणूक यंत्रणाचाही वापर केला जातो का याची शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. "पहिल्या फेरीत आमच्या संजय पवारांना ३३ मते मिळाले हाच आमचा विजय आहे." असं ते म्हणाले.

(Sanjay Raut On RajyaSabha Election Result)

दरम्यान "राज्यसभा निवडणुकांत आमचा पराभव झाला पण भाजपचा मोठा विजय झाला नाही. आम्ही व्यवहारात पडलो नाही आणि आम्ही व्यापारही केला नाही तरी आम्हाला पहिल्या पसंतीची ३३ मते मिळाली आहेत. ज्या कुणी गद्दारी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची नाव आमच्याकडे आहेत पण ठीके पाहून घेऊ." असा इशारा राऊतांनी दिला आहे.

"पहिल्या फेरीत संजय पवारांना ३३ आणि धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली होती. अपक्षातील सहा मते आम्हाला मिळाली पण काही घोडे विकले गेले आहेत. कारण बाजारात जास्त बोली लागली असेल." असा आरोप राऊतांनी केला आहे. आम्ही व्यापार केला नाही, ज्यांनी दगाबाजी केली त्यांची नावे आमच्याकडे आहेत, सुहास कांदे यांचे मत का बाद केले हा संशोधनाचा विषय असं म्हणत त्यांनी सुधीर मुनंगटीवार यांच्या मताला आक्षेप घेणार आहोत असं सांगितलं आहे.

दरम्यान जे घटक पक्ष आमच्यासोबत होते त्यातील एकही मत फुटलं नाही, फक्त घोडेबाजारातील लोकांचं मत आम्हाला मिळू शकलं नाही असं राऊत म्हणाले. चने टाकले की घोडे कुठेही पळतात, अशा गद्दारी करणाऱ्या आमदारांची नावे आमच्याकडे आहेत त्यांना आम्ही पाहून घेऊ अशा इशारा दिला आहे. तसेच "तुम्ही असेच रात्रीचे उपक्रम करत रहा आणि महाराष्ट्राचा एकदाच घोडेबाजार करून टाका." अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT