chandrakant patil sanjay raut e sakal
महाराष्ट्र बातम्या

'सगळी येड्यांची जत्रा'; गोव्याने वाढवलं महाराष्ट्राच्या राजकारणाचं तापमान

संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केली आहे.

सुधीर काकडे

आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पाच राज्यांत (Assembly Elections 2022) सध्या भाजपसह (BJP) सर्वच पक्षांनी प्रचारासाठी मोठी ताकद लावली आहे. या पाच राज्यांपैकी एक असणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये (Goa Assembly Elections 2022) पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना (Shivsena) आमने सामने आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यात गोव्याच्या निवडणुकीवरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना तुम्ही गोव्यातून निवडणूक लढवून दाखवावी असं आवाहन केलं होतं. त्यांच्या या टीकेला आता संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना गोव्यातून निवडणूक लढवण्याचं आवाहन केल्यानंतर राऊतांनी ही सगळी येड्यांची जत्रा असल्याची टीका केली आहे. ते म्हणाले की, "संजय राऊत यांनी गोव्यात जाऊन निवडणून लढवावी असं चंद्रकांत पाटील म्हणत आहेत. मात्र कोणत्याही विधानसभेमध्ये निवडणूक लढवायची असेल तर त्या राज्याच्या मतदार यादीमध्ये नाव असणं गरजेचं असतं, एवढं भाजप नेत्यांना माहिती नाही, याचं आश्चर्य वाटतं. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो."

गोवा, मणिपुर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी तब्बल 690 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या निडणुकांमध्ये कोरोनाचंही आव्हान असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT