sanjay raut on rahul shewale 
महाराष्ट्र बातम्या

राहुल शेवाळेंच्या गौप्यस्फोटावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासोबत गेलेल्या १२ खासदारांनी आज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत खासदार राहुल शेवाळे यांनी युतीबाबत एकामागून एक गौप्यस्फोट करत चार ते पाच वेळा शिवसेना-भाजप युतीसाठी प्रयत्न झाले पण प्रत्येक वेळी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं ती होऊ शकली नाही, असा दावा शेवाळे यांनी केला, त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे सगळ्या गोष्टी सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन सांगतात, त्यामुळे मविआच्या वेळीही, ही आघाडी कोणत्या परिस्थितीत करतोय ते त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन सांगितलं होतं, असे संजय राऊत म्हणाले. या प्रयोगाचं स्वागत सर्वांनी केलं होतं. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद खोलीत झालेल्या चर्चेचा काही भाग त्यांनी आम्हा सर्वांना सांगितला आहे. राजकारणात उलथापालथ झाली तरी मोदी आणि ठाकरे यांच्यातील नातं कायम राहीलं असे राऊत म्हणाले. ज्यांनी गोप्यस्फोट केला त्यांना मोदींनी सांगितलं असेल, त्यावर फाव विश्वास ठेऊ नका असे राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले, मला त्या सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की हे सगळे २०१४ मध्ये कुठे होते. भाजपने जेव्हा हिंदूत्वाची युती तोडली तेव्हा यापैकी किती जणांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले? आम्हाला युती हवी होती, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो. भारतीय जनता पक्षानेच २१४ साली युती तोडली आणि २०१९ साली देखील युती भाजपमुळेच तुटली. त्यामुळे त्यावर आता कोणी काही बोलत असतील तर त्याला अर्थ नाही, असे संजय राऊत म्हणाले.

राहुल शेवाळे म्हणाले होते की, यावेळी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं की, मला पण युती करायची आहे. मी यासाठी मी खूप प्रयत्न केला, पण जेव्हा मी पंतप्रधान मोदींना दिल्लीला भेटायला गेलो तेव्हा या भेटीत या गोष्टीचा उल्लेख केला. पण त्यानंतर जूनमध्ये ही बैठक झाल्यानंतर जुलैमध्ये अधिवेशनात १२ भाजपच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. पण त्यावेळी भाजपच्या वरीष्ठ नेतृत्वाला वाटलं की, एकीकडे आपल्याशी युतीचं बोलणं होत आणि दुसरीकडं बारा आमदारांवर कारवाई होते. त्यामुळं भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून नाराजी झाली. त्यामुळं कित्येक वेळा चर्चा झाल्यानंतरही पॉझिटिव्ह प्रतिसाद न मिळाल्यानं भाजपचे पक्षश्रेष्ठी नाराज होते. आता मी माझ्याकडून अनेकदा युतीसाठी प्रयत्न केले आणि तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न करुन पाहा, असंही उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं. यानंतर मी चार पाच खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांना भेटलो. पण आवश्यक प्रतिसाद न मिळाल्यानं ती झाली नाही, असं खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT