ramdas kadam and gajanan kirtikar  sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: "गजाभाऊ...तुम्ही फक्त अर्ज भरणार अन् मुलाला बिनविरोध निवडून आणणार, खंजीर खुपसू नका"; रामदास कदम यांचा गंभीर आरोप!

सकाळ डिजिटल टीम

Shivsena: मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघावरून शिवसेनेचे नेते (शिंदे गट) गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यात आता जुंपली आहे. कीर्तिकर हे पक्षाशी गद्दारी करीत आहेत, असा संशय व्यक्त करीत कदम यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला आहे.

मुंबई उत्तर - पश्चिम लोकसभा मतदार संघासाठी ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीची चर्चा आहे, तर गजानन कीर्तिकर हे देखील शिंदे गटाकडून उमेदवारी मागत आहेत. त्यामुळे रामदास कदम यांनी त्यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला आहे. कीर्तिकर लढणार नसतील तर लोकसभेची जागा पुत्र सिद्धेश कदम यांच्यासाठी सोडावी, अशी मागणी कदम यांनी यापूर्वीच पक्षाकडे केली आहे. यावर आपण लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे कीर्तिकर यांनी स्पष्ट केले होते.

कीर्तिकर पिता पुत्र हे प्रतिस्पर्धी पक्षात असूनही एकाच कार्यालयात बसून काम करतात, हे सगळे जग पाहत आहे. त्यामुळे दोन पक्षांतून एकाच घरातील सदस्यांना उमेदवारी कशी द्यायची, असा सवाल कदम यांनी केला आहे. ‘गजाभाऊ तुम्ही निवडणुकीला जरूर उभे राहा. तुमचा मुलगाही तुमच्याच मतदारसंघात उभा राहणार आहे. त्यामुळे उभे राहिल्यानंतर खरोखर लढा. फक्त अर्ज भरून घरात बसू नका," अशा शब्दात कदम यांनी कीर्तिकर यांचा समाचार घेतला आहे.

तुम्ही फक्त अर्ज भरणार आणि मुलाला बिनविरोध निवडून आणण्याची खेळी करू नका. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका एवढीच तुम्हाला विनंती आहे.

रामदास कदम, शिवसेनेचे नेते (शिंदे गट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT