ShivSena Shinde Group Melava Kolhapur MLA Sada Sarvankar esakal
महाराष्ट्र बातम्या

ठाकरेंनी माझ्याकडं उमेदवारीसाठी दहा कोटींची मागणी केली आणि आदेश बांदेकरांना..; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत पैशांसाठी गेलो, हे धादांत खोटे आहे.

सकाळ डिजिटल टीम

'शिवसैनिकांची कोंडी करण्याची व त्यांना जाळ्यात अडकविण्याचे काम बाळासाहेबांच्या काळात कधी झाले नाही.’

कोल्हापूर : ‘माझ्या आयुष्याचे गुरू मनोहर जोशी (Manohar Joshi) आहेत. त्यांनी माझी उमेदवारी कापली असे सांगून त्यांच्या घरावर हल्ला करण्याचा आदेश उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व संजय राऊत यांनी दिला होता, असा गौप्यस्फोट आमदार सदा सरवणकर यांनी केला.

मातोश्रीचा आदेश आम्ही अंतिम मानला. मात्र, हल्ला केल्याने निवडून कोण देणार, असा प्रश्‍न ठाकरे यांनी नंतर उपस्थित केला, असे हे कद्रू नेतृत्व असल्याने शिंदे यांनी उचललेले पाऊल शंभर टक्के बरोबर आहे,’ असे प्रतिपादनही शिंदे गटाच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार सदा सरवणकर यांनी केले.

शिवसेनेतर्फे आयोजित कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ पदाधिकारी मेळाव्यात सरवणकर बोलत होते. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमधील मिनी हॉलमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. सरवणकर म्हणाले, ‘आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत पैशांसाठी गेलो, हे धादांत खोटे आहे. अडीच वर्षांत ठाकरे आमदारांना भेटले नाहीत. मग पक्षाचे काम कसे करणार? कुटुंबप्रमुखाचे धोरण चांगले असेल तर घर टिकते.

ShivSena Shinde Group Melava Kolhapur MLA Sada Sarvankar

राष्ट्रवादीशी युती तोडण्याची आम्ही ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती. ती न तोडल्यानेच पक्षाची वाताहत झाली. आदित्य ठाकरे पावलोपावली आमदारांवर अन्याय करत होते. सेनेच्या आमदारांचे पंख छाटण्याचे पक्षाचे धोरण बनले होते. उद्धव ठाकरेंना आदित्यना मोठे करायचे होते. ठाकरे आमदारांच्या चेहऱ्याकडेही पाहायचे नाहीत. त्यांची भेट मिळत नसल्याने शिवसैनिकांनी शिंदे यांच्या नेतृत्त्वाला साथ दिली.’

सरवणकर पुढे म्हणाले, ‘शिंदेंसमवेत गेलेल्या आमदारांच्या घरांवर दगडफेक करण्याचे व घरे जाळण्याचे आदेश देण्यात आले होते. माझ्याकडे उमेदवारीसाठी दहा कोटी रुपयांची मागणी केली होती. ती मी देऊ शकत नसल्याने आदेश बांदेकरांना मातोश्रीतून उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू झाला. शिवसैनिकांची कोंडी करण्याची व त्यांना जाळ्यात अडकविण्याचे काम बाळासाहेबांच्या काळात कधी झाले नाही.’

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘आम्हाला खोकेवाले म्हणणारे ढोंमकावळे आहेत. आम्ही गद्दार नाही,‌ की पैशाला बळी पडलेलो नाही. मातोश्रीवरील चार-पाच जणांनी शिवसेना संपविण्याचे काम केले आहे. येत्या निवडणुकीत जिल्ह्यातून आम्ही दोन खासदार लोकसभेत पाठवू आणि आठ आमदार निवडून आणू.’

जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी दहा विधानसभा आमदार निवडून आणूया, असे सांगितले. मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी काँग्रेसला जनतेचे सोयरसुतक नसल्याचा आरोप केला. यावेळी शिवाजी जाधव, रणजित जाधव, राहुल चव्हाण, मंगल साळोखे उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व कद्रू

‘शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या रूपाने कद्रू नेतृत्व लाभल्याने आम्ही सेनेतून बाहेर पडलो. आम्ही गद्दार नसून निष्ठावंत शिवसैनिक आहोत'', असेही आमदार सदा सरवणकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT