Shivsena Dasara Melava Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Dasara Melava: जेवणाचे डबे अन् बॅगा आणू नका, पिकअप-ड्रॉपची सोय; दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाने केली कार्यकर्त्यांसाठी खास सुविधा

दरवर्षीप्रमाणे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

दरवर्षीप्रमाणे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवतीर्थावर शिवसेना (ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. शिवाजी पार्कमध्ये ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग आला असून आता तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र आहे.

त्याचबरोबर दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसैनिकांची चांगली सोय देखील ठाकरे गटाने केली आहे. जेवणाचे डबे आणि बॅगा आणू नका, असं आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे. त्याशिवाय शिवसैनिकांसाठी पिकअप-ड्रॉपची सोय देखील करण्यात आली आहे.

दसरा मेळाव्याची तयारी शेवटच्या टप्प्यात

शिवसेना ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर येणाऱ्या हजारो शिवसैनिकांसाठी विशेष नियोजन देखील करण्यात आलं आहे. अधिकाधिक शिवसैनिकांनी रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वेने दसरा मेळाव्याला येण्याचं आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आलेलं आहे.

राज्यभरातून तळागाळातील शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर येण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना शिवतीर्थापर्यंत आणण्यासाठी सहकार्य करण्याची जबाबदारी त्या-त्या जिल्ह्यात्या संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना देण्यात आली आहे.

शिवतीर्थावर येणाऱ्या शिवसैनिक आणि इतर मान्यवरांना शिवाजी पार्क येथे जाण्यास सोयीचे व्हावे, याकरिता स्थानिक पोलीस आणि वाहतूक यंत्रणा नियंत्रित करणाऱ्या पोलिसांना वाहतुकीचे आणि गर्दीचे योग्य नियंत्रण करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जेवणाचे डबे आणि बॅगा घेऊन येऊ नका, असं आवाहन देखील शिवसैनिकांना करण्यात आलं आहे. मेळाव्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांकडून महत्त्वाचे निर्देश दिले आहेत, त्यानुसार मेळाव्याला येताना जेवणाचे डबे, बॅगा अथवा कोणतीही वस्तू घेऊन मैदानात येऊ नये, असे सांगण्यात आले आहे.

ठाकरे गटाकडून पार्किंग पासून ते शिवतीर्थ यासाठी विशेष पिकअप आणि ड्रॉपची सोय करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहन उभी करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे

वाहने उभी करण्याची व्यवस्था खालीलप्रमाणे

बसेस, टेम्पो, ट्रॅव्हलर्स, मोठे टेम्पो

संपूर्ण सेनापती बापट मार्ग, दादर

कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग, माहीम कॉजवे ते माहीम जंक्शन

पाच गार्डन, माटुंगा

एडनवाला रोड, , माटुंगा

नाथालाल पारेख, माटुंगा

आर. ए. के. रोड, वडाळा

चारचाकी हलकी वाहने

इंडिया बुल इंटरनॅशनल सेंटर, सेनापती बापट मार्ग, दादर

इंडिया बुल्स 1 सेंटर, ज्युपिटर मिल कंपाऊंड, एलफिन्स्टन, सेनापती बापट मार्ग, दादर

कोहिनूर वाहनतळ, जे. के. सावंत मार्ग, शिवाजी पार्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

Navodaya Vidyalaya Admission: नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु; जाणून घ्या कसा आणि कुठे करावा

नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण' सिनेमाच्या टीझरची चर्चा; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

SCROLL FOR NEXT