Sunshma Andhare Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sunshma Andhare : आता राणा यांच्या भगव्या साडीवरुन वाद; अंधारेंनी उकरुन काढली 'ती' गोष्ट

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पठाण चित्रपटाच्या वादावर केलं भाष्य

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पठाण चित्रपटाच्या वादावर भाष्य करत खासदार नवनीत राणा यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. बीडमधील कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यामध्ये बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “सध्या पठाण नावाच्या चित्रपटातील एका गाण्यावरुन बराच वाद आणि चर्चा होत आहे. दीपीका पादुकोणच्या त्या गाण्यात खान नावाचा कलाकार आहे म्हणून गाण्यावर आक्षेप घेतला जातोय का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.

तर पुढे बोलतं सुषमा अंधारे म्हणाल्या की, पण तशाच भगव्या रंगाची साडी घालून आमच्या नवनीत अक्कानी पण डान्स केला आहे. पण नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चाच होत नाही. का बरं? नवनीत अक्काच्या नावापुढे खान, शेख, तांबोळी असं काहीच नाही म्हणून का?”असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

हे ही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

काय म्हणाल्या आहेत सुषमा अंधारे?

सध्या पठाण नावाच्या चित्रपटातील एका गाण्यावरुन बराच वाद आणि चर्चा होत आहे. दीपीका पादुकोणच्या त्या गाण्यात खान नावाचा कलाकार आहे म्हणून गाण्यावर आक्षेप घेतला जातोय का? पण तशाच भगव्या रंगाची साडी घालून आमच्या नवनीत अक्कानी पण डान्स केला आहे. पण नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चाच होत नाही. का बरं? नवनीत अक्काच्या नावापुढे खान, शेख, तांबोळी असं काहीच नाही म्हणून का?”

गेल्या काही दिवसांपासून पठाण चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटातील एका गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पादूकोणने भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. त्यामुळे हा वाद चांगलाच पेटला. या वादावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या या चित्रपटात खान नावाचा व्यक्ति असल्यामुळे हा वाद निर्माण केला जात असल्याचे बोलले जात असतानाच सुषमा अंधारे यांनी या वादात उडी घेत खासदार नवनीत राणा यांना लक्ष केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Solapur News: सोलापूर काँग्रेसच्या मातृसत्ता हरपली! माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT