Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Supreme Court Hearing Sakal Digita
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आता 29 ऑगस्टला?

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : शिवसेनेच्या वादावरील सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी या प्रकरणावर निकाल देताना हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवलं होतं. त्यानुसार आज सुनावणी होणं अपेक्षित होतं पण ही सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. २९ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.

(Shivsena Supreme Court)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी सातत्यानं पुढं ढकलली जात होती. वारंवार तारीख पुढे जात असल्यानं शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण कोर्टात मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं प्रकरण पटलावर घेण्यास मान्यता दिली. सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा, न्या. हिमा कोहली, न्या. कृष्णमुरारी यांच्याच खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली होती. त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं होतं.

दरम्यान, शिवसेनेशी बंड करत एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत काही आमदारांना घेत गुवाहटी गाठली होती. त्यानंतर शिवसेनेचे आपल्या आमदारांनी व्हीप न पाळल्यावरून गेलेल्या १६ आमदारांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेचे सुनील प्रभू यांना काढून टाकत भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवड केली होती. त्यानंतर या निवडीवर आक्षेप घेत शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या वादावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलत असून आता ही सुनावणी २९ ऑगस्टला होणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT