Uddhav Thackeray Latest News | Shiv Sena News esakal
महाराष्ट्र बातम्या

SC मधल्या सुनावणीआधीच शिल्लक आमदारांना ठाकरेंचं भावनिक पत्र

आईच्या दूधाशी बेईमानी करु नका हा मंत्र तुम्ही पाळलात, अशा शब्दांत ठाकरेंनी आमदारांचं कौतुकही केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर आता पक्ष सावध भूमिकेत आहे. राहिलेल्या आमदारांची मनधरणी, रस्त्यावर उतरुन आक्रमक भूमिका घेणं अशी मोहीम आता सेना राबवताना दिसत आहे. अशातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना भावनिक पत्र लिहित त्यांचे आभार मानले आहेत. (Uddhav Thackeray Latest News)

एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) ऐतिहासिक बंडानंतर ४० आमदार शिंदे गटात गेले. आणखी आमदार त्यांच्या गटात जाण्याच्या चर्चा कानावर पडत आहेत. अशातच आपल्यासोबत शिल्लक राहिलेल्या आमदारांना धरुन ठेवण्याचा एक भावनिक प्रयत्न उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेला दिसून येत आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याआधीच उद्धव ठाकरेंनी सोबत राहिलेल्या आमदारांना भावनिक साद घातली आहे. आपल्या अडचणीच्या आणि संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत. (Shiv Sena News)

या पत्रात म्हटलं आहे की, शिवसेना आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हेच आपलं सर्वस्व आहे. निष्ठा आणि अस्मितेची महती आपल्याला बाळासाहेबांनी शिकवली आहे. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण निष्ठेचं पालन केलंत. वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक असल्याचं आपण दाखवून दिलंय. आपण निष्ठेने शिवसेनेबाबत राहिलात. आपल्या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला आणि शिवसेनेला बळ मिळालं, असंही पत्रात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT