पैठण : "आमच्यासोबत ४० आमदार आहेत, १२ खासदार आहेत पक्षाचे सर्वांत जास्त नेते आमच्याकडेच आहेत मग तुम्हीच सांगा ओरिजनल पक्ष कोणता? अन् ते म्हणतात आम्ही गद्दार. पण खरा पक्ष आमचा आहे मग जे आमच्यासोबत आले नाही तेच खरे गद्दार." असं वक्तव्य शिंदे गटातील मंत्री संदिपान भुमरे यांनी पैठणमध्ये एका कार्यक्रमात बोलताना केलं. याबरोबर त्यांनी ठाकरे गटातील आणखी दोन आमदार फुटणार असल्याचा दावाही केला.
संदीपान भुमरे यांनी ठाकरे गटातील दोन आमदार फुटणार असल्याच्या केलेल्या दाव्यावरून ठाकरे गटाच्या संकटांत अजून भर पडली आहे तर ते दोन आमदार कोण असतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. "आम्हाला एकजण येऊन भेटला, म्हणाला साहेब, कसं करू आता लई दिवस झाले.... आम्ही म्हटलं की, काही हरकत नाही... या." असं भुमरे म्हणाले आहेत.
पक्षचिन्हाच्या वादावर बोलताना भुमरे म्हणाले, "मला तरी वाटतं तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने चिन्हसुद्धा आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही, आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे." त्यानंतर ठाकरे गटाचे टेन्शनमध्ये भर पडली आहे. राहिलेल्या निष्ठावंत आमदारापैकी दोन आमदार शिंदे गटाचा हात धरणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, ईडीची भिती दाखवून आमदार फोडण्याचा भाजप प्रयत्न करत आहे असा आरोप शिवसेनेकडून वारंवार होत आहे. त्याचबरोबर, जे आमदार किंवा नेते शिंदे गटात दाखल झाले आहेत त्यांच्यामागील ईडी चौकशीचा ससेमिरा कमी झाल्याचं चित्र असून भुमरे यांनी दावा केलेले दोन आमदार कोण आहेत हे पहावे लागणार आहे. तसेच शिवसेनेशी निष्ठा ठेवलेल्या आणि उद्धव ठाकरेंची साथ न सोडलेल्या आमदारांना गद्दार म्हणत भुमरेंनी चिमटा काढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.