Aditya Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना ५० वर्ष वयोगटातील उमेदवार देणार? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

मनपा निवडणुकांसाठी काय असेल शिवसेनेचा नवा फॉर्म्युला?

सुधीर काकडे

आगामी काळातील महानगरपालिका निवडणुकांसाठी (Municipal Corporation Election) तिकीट कुणाला मिळणार? या प्रश्नावरून मागच्या काही दिवसांत शिवसेनेच्या (Shivsena) आजी माजी नगरसेवक आणि इच्छुकांमध्ये मध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारांना तिकीट मिळणार की नाही? यावरून अनेक वेगवेगळ्या बातम्या शिवसैनिकांमध्ये पसरल्या होत्या. मात्र आता थेट युवा सेना प्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीच याबद्दल पक्षाची भुमिका स्पष्ट केली आहे.

महानगरपालिका निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांपैकी फक्त ५० वर्षांपेक्षा वय कमी असलेल्या उमेदवारांनाच तिकीट मिळेल अशी अफवा पसरली होती. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी असं काहीही होणार नसल्याचं सांगितलं आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडून या बातमीचं खंडन करण्यात आलंय. ते म्हणाले, "विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचा पट्टा सक्रीय, राज्यात 'या' भागात मुसळधार; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

मी २ महिन्यांची गर्भवती, निदा खानची अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव; तर पोलिसांची ५ पथकं अजूनही घेतायत शोध

Akshaya Tritiya gold rate : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं झालं महाग, चांदीही वधारली; वाचा आजचा नवा भाव

'गजवा ए हिंद'च्या नावावर धर्मांतराचा प्रयत्न, दारू अन् सिगारेट पिण्यासाठी बळजबरी, लव्ह बाइट म्हणत तरुणीच्या शरीरावर केल्या जखमा

Akshaya Tritiya Wishes in Marathi: लक्ष्मी कृपा, सुखाचा वर्षाव...साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीयेच्या कुटुंब अन् मित्रपरिवाराला द्या मराठीतून खास शुभेच्छा!

SCROLL FOR NEXT