महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेने मोदींच्या फोटोने निवडणूक जिंकली मग गद्दारी केली - प्रकाश जावडेकर

"ज्यांनी 150 वर्ष भारतावर राज्य केले, त्या ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मोदींचे कौतुक केले"

सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: "मोदींच्या (Pm modi) नेतृत्वाला आणखी एक परिमाण मिळाले. ते सलग 20 वर्ष राज्य आणि देशाचे प्रमुख म्हणून काम करत आहेत. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. गरीबालाही वाटते ते आमच्यातून आलेत, सैनिकांना देखील वाटते की हे आपल्यातून आलेत. भारताच्या विविध ठिकाणी वर्षानुवर्षं रखडलेले प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेत" असे भाजपा नेते प्रकाश जावडेकर (Prakash javdekar) म्हणाले. "ज्यांनी 150 वर्ष भारतावर राज्य केले, त्या ब्रिटनच्या पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. मोदींच्या लोकप्रियतेचे माप संपूर्ण जगात आहे" असे जावडेकर म्हणाले.

"काँग्रेसप्रणीस संपुआने 70 हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी केली. पण मोदींनी 7 लाख करोड शेतकऱ्यांच्या खात्यात योजनेच्या माध्यमातून जमा केले. आज 80 देशांना भारताने लस पुरवली. आता चार हजार ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता भारताला बाहेरून ऑक्सिजन आणावे लागणार नाही" असे जावेडकर म्हणाले.

"मास्क नको म्हणून इतर देशात निदर्शने झाली पण आपल्या देशात नाही झाली. चार कोटी घरात वीज कनेक्शन, 50 कोटी लोकांसाठी आयुष्यमान भारत असे एकापेक्षा एक योजना आणल्या. बेटी बचाव बेटी पढाव आणि स्वच्छ भारत अभियान मोदींनी राबवले" अशा शब्दात जावडेकरांनी मोदींचे कौतुक केले. "शिवसेना देखील मोदींचा फोटो लावून निवडून आली आणि मग त्यांनी गद्दारी केली" अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT